पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की करणा:या माजी आमदार पुत्राला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 12:44 IST2018-11-21T12:44:14+5:302018-11-21T12:44:17+5:30

सोमवारी रात्रीचा प्रकार : 3 डिसेंबर्पयत न्यायालयीन कोठडी

Former Deputy Commissioner of Police arrested the sub-inspector | पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की करणा:या माजी आमदार पुत्राला अटक

पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की करणा:या माजी आमदार पुत्राला अटक

नंदुरबार : रात्री उशिरा शहरात गस्त घालणा:या पथकातील पोलीस उपनिरीक्षकासोबत हुज्जत घालून वाद घातल्याप्रकरणी नवापूरचे माजी आमदार शरद गावीत यांच्या मुलासह एकास पोलीसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली़ दोघांना न्यायालयात हजर केले असता 3 डिसेंबर्पयत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आह़े
सोमवारी रात्री शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी़पी़ सोनवणे हे पथकासह शहरात गस्त घालत असताना विनानंबर मोटारसायकलवर गौरव शरद गावीत, अविनाश सुदाम पवार व मिलींद वळवी हे तिघे फिरत असल्याचे आढळून आल़े होत़े यावेळी तिघांना हटकले असता, त्यांनी पोलीस पथकासोबत वाद घालण्यास सुरुवात केली़ पोलीसांनी समज देऊनही त्यांनी ऐकून न घेतल्याने पोलीसांनी तिघांना ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणल़े दरम्यान याठिकाणी गौरव गावीत याने पोलीस अधिकारी पी़पी़सोनवणे यांना धक्काबुक्की केली़  पहाटेर्पयत त्याच्याकडून वाद सुरु होता़ यानंतर पोलीसांनी दोघांना अटक करुन ताब्यात घेतल़े
पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन गौरव शरद गावीत, अविनाश पवार आणि मिलींद वळवी याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ 
 

Web Title: Former Deputy Commissioner of Police arrested the sub-inspector