वन अधिका:यांना बेदम मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:59 IST2019-08-16T12:59:39+5:302019-08-16T12:59:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चौकशीसाठी वन विभागाच्या कार्यालयात घेवून जाणा:या युवकाच्या वडीलांनी वन अधिका:यांना मारहाण केल्याची घटना नांदवन, ...

वन अधिका:यांना बेदम मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चौकशीसाठी वन विभागाच्या कार्यालयात घेवून जाणा:या युवकाच्या वडीलांनी वन अधिका:यांना मारहाण केल्याची घटना नांदवन, ता.नवापूर येथे 13 ऑगस्ट रोजी घडली. याबाबत दोघांविरुद्ध नवापूर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वन विभागाचे अधिकारी नशीब वाडय़ा नाईक यास एका प्रकरणाच्या चौकशीसाठी घेवून जात होते. त्याचा राग येवून नशीब याचे वडील वाडय़ा राज्या नाईक व आई इलूबाई वाडय़ा नाईक रा.जामण्या विजापूर, ता.नवापूर यांनी वन अधिकारी उपेंद्रसिंग दादुसिंग राऊलजी यांना व त्यांच्या पथकांना अडकाव केला. यावेळी वाडय़ा नाईक यांनी उपेंद्रसिंह यांना हाताबुक्यांनी बेदम मारहाण केली. याबाबत नवापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.