वन अतिक्रमणधारकांनी वाचला समस्यांचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 12:48 IST2020-10-09T12:48:09+5:302020-10-09T12:48:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : वनजमिनीचे प्रलंबित दाव्यांबरोबरच मिळालेल्या वनपट्ट्यांची मोजणी तातडीने होऊन सातबारे उतारे उपलब्ध होण्यासाठी गेल्या दोन-तीन ...

वन अतिक्रमणधारकांनी वाचला समस्यांचा पाढा
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : वनजमिनीचे प्रलंबित दाव्यांबरोबरच मिळालेल्या वनपट्ट्यांची मोजणी तातडीने होऊन सातबारे उतारे उपलब्ध होण्यासाठी गेल्या दोन-तीन वर्षापासून सातत्याने महसूल प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याची व्यथा वन अतिक्रमणधारकांनी आमदार राजेश पाडवी यांच्यापुढे मांडली. दरम्यान, पाडवी यांनी प्रलंबित दाव्यांबाबत संबंधित मंत्रालयात पाठपुरावा करून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन वनजमीन अतिक्रमणधारकांना दिले. त्यामुळे त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
तळोदा तालुक्यातील अमोनी येथे वन अतिक्रमणधारकांच्या प्रश्नांबाबत आमदार राजेश पाडवी यांनी बैठक घेतली. या वेळी तालुका वनसमितीचे सदस्य दाज्या पावरा, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष छगन कोठारी, तालुकाध्यक्ष यशवंत पाडवी, अमोनीचे माजी सरपंच चंदन पाडवी, वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष भिमा पाडवी, उपसरपंच दिलीप पावरा, पिसा तडवी, गुड्डू वळवी उपस्थित होते.
प्रारंभी आमदार पाडवी यांनी अतिक्रमणधारकांच्या समस्या जाणून घेतल्या. अतिक्रमणधारकांनी मोठ्या संख्येने समस्या उपस्थित केल्या. गेल्या अनेक वर्षापासून आमचे वनदावे प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्याबाबत अजूनही प्रशासन स्तरावर कार्यवाही केली जात नाही. जो अधिकारी येतो तो केवळ आम्हाला आश्वासनच देत असतो. एवढेच नव्हे तर तालुक्यात हजारो वनपट्टेधारकांची वनजमिनीची अजूनही जीपीएस प्रणालीतून जमीन मोजण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्हाला जमिनीचे सातबारेही उपलब्ध होत नाही. सातबाऱ्यांअभावी राष्टÑीयकृत व सहकारी बँक पीक कर्ज देत नाही. आम्ही सातबारा उतारा मिळण्यासाठी अक्षरश: वैतागलो असल्याची व्यथा उपस्थित अतिक्रमणधारकांनी बोलून दाखवली. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनीही उदासीन भूमिका घेतल्यामुळे आमचे प्रश्न सुटत नसल्याचा आरोप वनजमीन अतिक्रमणधारकांनी या वेळी केला.
आमदार पाडवी यांनी वनपट्टेधारकांच्या प्रलंबित दाव्यांसंदर्भात संबंधित मंत्रालय व वरिष्ठ अधिकाºयांकडे ठोस पाठपुरावा करून तशी कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या बैठकीत अमोनी परिसरातील वनजमीनधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत यशवंत पाडवी, दाज्या पावरा यांनीही मार्गदर्शन केले. आभार चंदन पाडवी यांनी मानले.
- उपविभागीय वनसमितीची आज बैठक
- वनअतिक्रमण जमीन धारकांचे प्रलंबित प्रश्न तातडने सोडविण्यात यावेत यासाठी उपविभाग स्तरीय समितीचे गठन जिल्हाधिकाºयांनी केले होते. या समितीची बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली असल्याचे समितीचे अशासकीय सदस्य व पंचायत समितीचे सदस्य दाज्या पावरा यांनी सांगितले. समितीच्या पुनर्गठणानंतर पहिलीच बैठक समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकाºयांनी आयोजित केली आहे. निदान वनपट्टेधारकांच्या वनपट्ट्यांबाबत आढावा तरी घेतला जाईल. त्यामुळे वनजमीन धारकांच्या आशांवर फुंकर घातली जाईल.