पूरग्रस्तांना मिळणार 1 कोटी रुपयांचा तातडीचा मदतनिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 11:56 IST2019-08-13T11:56:28+5:302019-08-13T11:56:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतीवृष्टी आणि पूरामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या घरांचे पंचनामे प्रशासनाने पूर्ण केले असून येत्या चार ...

Flood victims receive Rs 1 crore emergency relief | पूरग्रस्तांना मिळणार 1 कोटी रुपयांचा तातडीचा मदतनिधी

पूरग्रस्तांना मिळणार 1 कोटी रुपयांचा तातडीचा मदतनिधी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अतीवृष्टी आणि पूरामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या घरांचे पंचनामे प्रशासनाने पूर्ण केले असून येत्या चार दिवसात त्यांच्या खात्यावर 1 कोटी रुपयांचा मदतनिधी वर्ग करण्याची तयारी सुरु केली आह़े अंशत: बाधित, पूर्णपणे जमिनदोस्त घरे, जनवारे व मयत व्यक्तींच्या वारसांना ही मदत देण्यात येणार आह़े      
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यांना अतीवृष्टीचा फटका बसला होता़ यातून नदी-नाल्यांना पूर येऊन घरांची पडझड तसेच गुरांची मृत्यू झाला होता़ जिल्ह्यात पुरात वाहून गेल्याने तसेच अतीवृष्टीमुळे भिंती पडल्याने सात जणांना जीव गमावावा लागला आह़े या सर्व स्थितीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर सुरु केले होत़े रविवारी रात्री उशिरा पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर सोमवारी सकाळी तालुकानिहाय अहवाल तयार करुन तो प्रशासनाकडे पाठवण्यात आला होता़ जिल्हा प्रशासनाला अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोषागार विभागाकडे देण्यात येणा:या निधीच्या मागणीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या़ त्यानुसार मंगळवारी सकाळी निधीची मागणी करुन तातडीने बाधितांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती आह़े 

्रप्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 7 मयतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये देण्यात आले आहेत़ भिमसिंग वळवी (धानोरा), शेख चांद (नवापुर), पवन पवार (असलोद), सुकराम ठाकरे (पाडळदा), लिलाबाई पाडवी (मौलीपाडा), कांताबाई भिल (रायखेड) व गणेश पाडवी (आमखेडीपाडा) यांचा अतीवृष्टीदरम्यान मृत्यू झाला आह़े पुराच्या पाण्यात 6 मोठी जनवारे वाहून गेली होती़ त्यांच्या मालकांना प्रत्येकी 30 हजार, 78 लहान जनावरांच्या मालकांना प्रत्येकी 3 हजार, 4 बैलांच्या मालकांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आह़े सर्व सहा तालुक्यात 2 हजार 372 घरांची अंशत: पडझड झाली होती़ या लाभार्थीना प्रत्येकी 3 हजार 200 रुपयांची मदत दिली जाणार आह़े तर 57 घरे पूर्णपणे कोसळल्याचे पंचनाम्यात स्पष्ट झाल्याने त्यांना प्रत्येकी 95 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आह़े पंचनाम्यांदरम्यान तलाठी व मंडळाधिका:यांनी बँक खात्यांची माहिती घेतल्याने आठवडाभरात त्यांच्या खात्यावर मदतनिधी जमा होणार आह़े 

शासनाने काही महिन्यांपूर्वी काढलेल्या अध्यादेशानुसार अंशत: पडझड झालेल्या घरांसाठी साधारण 11 हजार रुपयांचा मदतनिधी प्रस्तावित आह़े यात 6 हजार रुपये घराची दुरुस्ती, प्रत्येकी अडीच हजार रुपये घरातील भांडी व कपडय़ांसाठी वितरीत करण्याचे निश्चित करण्यात आले आह़े अशात जिल्हा प्रशासनाकडून प्रत्येकी 3 हजार 200 रुपयांर्पयत देण्याचे नियोजन करण्यात आल्याने लाभार्थीकडून नाराजी व्यक्त होत आह़े प्रशासनाकडून शेतजमिनींचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत़ या पंचनाम्यांचे अहवाल शासनाकडे देण्यात येणार आहेत़ त्यानुसार शासन येत्या काळात मदतनिधी जाहिर करणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े शेतक:यांची जमिन खरडली गेल्याने त्यांना किमान हेक्टरी 1 लाख रुपयार्पयत मदत मिळण्याची अपेक्षा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े 
 

Web Title: Flood victims receive Rs 1 crore emergency relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.