पूर रेषेचा सव्र्हे ठरला कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:34 IST2019-08-16T12:33:59+5:302019-08-16T12:34:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 17 वर्षापूर्वी जिल्ह्यातील पूर रेषेतील गावांचा सव्र्हे करण्यात आला. त्यावेळी नदी काठांवरील 29 गावांचा ...

The flood line was outdated | पूर रेषेचा सव्र्हे ठरला कालबाह्य

पूर रेषेचा सव्र्हे ठरला कालबाह्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : 17 वर्षापूर्वी जिल्ह्यातील पूर रेषेतील गावांचा सव्र्हे करण्यात आला. त्यावेळी नदी काठांवरील 29 गावांचा पूर रेषेत समावेश करण्यात आला.  त्या नंतर कुठलीही सुधारणा झाली नाही किंवा फेर सव्र्हेक्षण देखील करण्यात आले नाही. यामुळे यंदा दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीत अनेक गावे पुन्हा पाण्याखाली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, 17 वर्षात अनेक बदल झाले. लोकसंख्या वाढली. त्यामुळे नव्याने सव्र्हेक्षण करण्याची आवश्यकता आहे. 
जिल्ह्यात यंदा दोन वेळा अतिवृष्टी झाली. सलग दहा दिवस पावसाची संततधार होती. दोन महिन्यांच्या सरासरीच्या तुलनेत 48 टक्के जादा पाऊस झाला. परिणामी धरणांमधील पाणी साठा सोडण्यात आला. नदी, नाल्यांना पूर आले. त्यात अनेक गावे आणि वसाहती पाण्याखाली गेल्या. यात जवळपास हजार घरांचे तर आठ हजार   हेक्टरपेक्षा अधीक शेतीचे नुकसान झाले. याला कारण पूर रेषेचे नव्याने सव्र्हेक्षण न करणे. 17 वर्षापूर्वीच्या सव्र्हेक्षणाच्या आधारेच केवळ कागदावर उपाययोजना केल्या जातात. दरवर्षाची तीच स्थिती    आहे. यंदाच्या अतीवृष्टीत ही बाब पुन्हा एकदा उघड झाली आहे.    हजारो नागरिकांना फटका बसला. 
29 गावांचा सव्र्हे..
जिल्ह्यात पूर रेषेतील 29 गावे प्रशासनाने निश्चित केली आहेत. नदी काठावरील अशा गावांना दोन प्रकारात विभागले जाते. एक रेड लाईनची गावे व दुसरी स्काय लाईनची गावे. स्काय लाईनच्या गावांमध्ये नदीला थोडाजरी पूर आला तरी नदीचे पाणी थेट गावात किंवा गावातील नदीकाठच्या वस्तीत घुसते. तर रेड लाईनच्या गावांमध्ये नदी किंवा नाल्याला अती पूर आला तर ते पाणी थेट गावात घुसते व गावाचा संपर्क तुटतो.
अशी आहेत गावे
रेड लाईन अर्थात लाल पट्टय़ातील गावांमध्ये विशेष लक्ष देण्यात येते. या गावांची संख्या 29 असून त्यात शहादा तालुक्यातील 18 तर नंदुरबार तालुक्यातील 11 गावांचा समावेश आहे. 
या गावांमध्ये शहादा तालुक्यातील जावदे, तोरखेडा, दोंदवाडे, खैरवे, भडगाव, टेंभे, कामखेडा, सारंगखेडा, खरवड, कौठळ, बामखेडा, बिलाडी, ससदे, शेल्टी, पळासखेडा, नांदरखेडा, प्रकाशा या गावांचा समावेश आहे. तर नंदुरबार तालुक्यातील सावळदे, कोरीट, सुजालपूर, बोराळे, नाशिंदे, हाटमोहिदा, आमळथे, ओसर्ली, खापरखेडा, ओसर्ली आणि कोपर्ली  या गावांचा समावेश आहे. अती पूर आला तरच या गावांमध्ये पाणी जाण्याची शक्यता असते असे प्रशासनाचे म्हणने आहे. तोर्पयत प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्यास वेळ मिळत असतो असेही सांगण्यात आले.
नव्याने सव्र्हे व्हावा
सध्या नदी, नाल्यांवरील अतिक्रमणामुळे ते शेतीसाठी बुजविण्यात आल्यामुळे त्यांची अवस्था बदलली आहे. काही ठिकाणी नदी व नाल्यांचा प्रवाहात बदल देखील झाला आहे. तापी व इतर नद्यांमधून होणारा वाळूचा बेसुमार उपसांमुळे काठावरील गावांना    आधीच पर्यावरणाचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे नदी,   नाल्याला थोडाजरी पूर आला तरी मोठा धोका निर्माण होण्याचा संभव असतो. ही बाब यंदाच्या अतिवृष्टीत अधोरेखीत झाली आहे. 

रेड लाईनची निश्चित केलेल्या गावांच्या भौगोलिक परिस्थितीवर नजर टाकल्यास सर्वच गावे ही केवळ तापी नदी काठावरील निवडण्यात आली आहेत. परिणामी शहादा व नंदुरबार तालुक्यातीलच गावांचा त्यात समावेश झाला   आहे. 
जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या हद्दीतून जाणा:या नद्यांमध्ये तापी व्यतिरिक्त नर्मदा ही मोठी नदी तर गोमाई, रंगावली, शिवण, देहली, उदय, सुसरी, खर्डा आदी लहान नद्या देखील आहेत. 
या नद्यांच्या काठावर देखील मोठय़ा प्रमाणावर गावे आहेत. या नद्यांना अतिवृष्टी झाल्यास मोठा पूर देखील येतो. त्याचे पाणी गावालगतच्या वस्तीत शिरते. काही गावांचा संपर्क देखील तुटतो. असे असतांना या नदी काठांवरील गावांचा समावेशच पूर रेषेतील गावांमध्ये करण्यात आलेला नाही हे विशेष.
 

Web Title: The flood line was outdated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.