पाच हजार क्विंटल कापूस आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 12:09 PM2020-11-20T12:09:33+5:302020-11-20T12:09:40+5:30

 लाेकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  सीसीआयकडून   पळाशी येथील केंद्रात गुरूवारपासून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त ...

Five thousand quintals of cotton arrives | पाच हजार क्विंटल कापूस आवक

पाच हजार क्विंटल कापूस आवक

Next

 लाेकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  सीसीआयकडून   पळाशी येथील केंद्रात गुरूवारपासून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त तीन दिवस बंद असल्याने या केंद्रात गुरूवारी पहिल्याच दिवशी ५ हजार क्विंटल कापूस आवक झाली.  
दिवाळीमुळे बंद असलेल्या केंद्रात गुरूवारी सकाळपासून वाहनांची आवक सुरू झाली होती. एकूण ३५० वाहने दिवसभरात दाखल झाली होती. रात्री उशिरापर्यंत  केंद्रात कापूस मोजणी सुरू होती. नंदुरबार तालुक्यासह अक्कलकुवा, तळोदा आणि नवापूर तालुक्यातील नोंदणीकृत शेतक-यांनी येथे कापूस विक्रीसाठी आणला होता.  या कापसासाठी सीसीआयने ५ हजार ५००, ५ हजार ५२५, ५ हजार ६६५ व ५ हजार ७२५ असे दर निश्चित केले होते. यापूर्वी  पळाशी येथील कापूस खरेदी केंद्रात १२ हजार ४५४ क्विंटल कापूस आवक झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदी बंद असल्याने आवक थांबली होती. दरम्यान गुरूवारी खरेदी पूर्ववत सुरू झाल्यानंतर  कापूस विक्री करताना, पीक लागवड केल्याचा सातबारा उतारा, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत आणि आधार कार्डची झेरॉक्स प्रत आदी कागदपत्रे दोन प्रतीत  सोबत आणणे जरुरीचे असल्याचे कळवण्यात आले आहे. यामुळे विक्री केलेल्या कापसाचे बिल त्याच दिवशी तयार करणे  सोयीचे होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती व सचिव यांनी दिली आहे. 
यंदा सीसीआयकडून कापूस खरेदी माॅईश्चर मशिन लावत मोजणी होत असल्याने ओलाव्याचा प्रश्न मार्गी निघाला आहे. शुक्रवार आणि शनिवारीही कापसाची मोठी आवक होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने बाजार समितीकडून तयारी करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहेत. शहादा येथील केंद्रातही मोठ्या संख्येने वाहने आल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

Web Title: Five thousand quintals of cotton arrives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.