अमोदा फाटय़ाजवळील अपघातात पाच जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 11:22 IST2017-12-28T11:21:12+5:302017-12-28T11:22:12+5:30

Five people were killed in a road accident near Amoda Fatah | अमोदा फाटय़ाजवळील अपघातात पाच जण ठार

अमोदा फाटय़ाजवळील अपघातात पाच जण ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा-म्हसावद रस्त्यावरील अमोदा फाटय़ाजवळ 407 टेम्पो व अॅपे रिक्षाच्या झालेल्या भिषण अपघातात पाच जण जागीच मृत होऊन सुमारे 14 जण गंभीर जखमी झाले आहेत़ अपघातातील मृत सर्व तलावाडी ता़ शहादा येथील असल्याचे समजते आह़े
गुरुवारी 28 रोजी सकाळी हा भिषण अपघात झाला़ या अपघातात जागीच पाच जण मृत झाल्याची माहिती आह़े याबाबत सविस्त वृत्त असे की, तलावडी येथील आदिवासी बांधव भोंगरा येथे इंदल कार्यक्रमासाठी बुधवारी रात्री गेले होत़े रात्रभर कार्यक्रम साजरा केल्यानंतर सकाळी ते अॅपे रिक्षाने गावी परतत असताना त्यावेळी म्हसावद ते तलावडीदरम्यान त्यांच्या रिक्षाला समारुन भरधाव येणा:या टेम्पोने जबर धडक दिली़ त्यात, सोगा रायमल पावरा, रोहिदास कमा पावरा, गोरख इंदा पावरा, शिका:या पाच्या पावरा व गुलाल फकिरा पावरा हे जागीच ठार झाले आहेत़ त्याच प्रमाणे इतर 14 जण गंभीर जखमी झाले आहेत़ जखमींवर नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आह़े

Web Title: Five people were killed in a road accident near Amoda Fatah