पाचच कर्मचा:यांवर शहरातील आरोग्याचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:10 IST2019-11-05T13:07:49+5:302019-11-05T13:10:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : मलेरिया आणि डेंग्यूच्या वाढत्या साथींच्या पाश्र्वभूमीवर येथील आरोग्य यंत्रणेकडून सोमवारी शहरातील प्रत्येक घरांमधील रुग्ण ...

पाचच कर्मचा:यांवर शहरातील आरोग्याचा भार
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : मलेरिया आणि डेंग्यूच्या वाढत्या साथींच्या पाश्र्वभूमीवर येथील आरोग्य यंत्रणेकडून सोमवारी शहरातील प्रत्येक घरांमधील रुग्ण सव्रेक्षण, औषधोपचार व दूषित पाण्याची तपासणी केली जात आहे. यासाठी ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचा:यांची मदत घेतली जात असली तरी 40 हजार लोकसंख्येच्या शहरासाठी सध्या केवळ पाचच कर्मचा:यांवर नागरिकांच्या आरोग्याचा गाडा सुरू आहे.
कर्मचा:यांची तुटपूंजी संख्या लक्षात घेऊन नेहमीच इकडून-तिकडून कर्मचारी आणावे लागत असतात. आरोग्य प्रशासनाने निदान शहरवासियांच्या आरोग्याबाबत सजग राहून पुरेशे कर्मचारी नियुक्त करावे, अशी अपेक्षा आहे.
मलेरिया व डेंग्युची साथ शहरात पसरली आहे. या साथींचे संशयित रुग्ण घरोघरी दिसून येत आहेत. याच पाश्र्वभूमिवर येथील आरोग्य यंत्रणेकडून शहरातील प्रत्येक घरांचे सव्रेक्षण केले जात आहे. हे सव्रेक्षण करताना आरोग्य कर्मचारी घरातील अशा रुग्णांची चौकशी करून त्यांच्यावर औषधोपचार करीत आहेत. याशिवाय साठविलेल्या पाण्याच्या टाक्यांची तपासणी करून तेथे औषधे टाकत आहेत. तसेच दूषित पाण्याचे नमुनेदेखील घेतले जात आहेत. त्याच बरोबर नागरिकांमध्ये मलेरिया व डेंग्युबाबत जनजागृती केली जात आहे.
यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांनी वेगवेगळी 18 पथके नियुक्ती केली आहेत. यात ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, आरोग्य सेवक व आशा कर्मचा:यांचा समावेश आहे. त्यामुळे साहजिकच युद्ध पातळीवर आरोग्य यंत्रणेकडून कार्यवाही केली जात आहे. बाहेरील आरोग्य यंत्रणेकडून काम भागविले जात असले तरी शहरातील नागरिक, बालके, गरोदर मातांची नियमित आरोग्य तपासणी आणि लसीकरणासाठी सद्या पाचच कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचा:यांवर नागरिकांचा आरोग्याचा डोलारा सुरू आहे.
वास्तविक शहराची लोकसंख्या साधारण 40 हजारापेक्षा अधिक आहे. त्यातुलनेत कर्मचा:यांची संख्या वाढविणे अपेक्षित असतांना वरिष्ठ आरोग्य प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे पालिकेने आपला दवाखाना बंद केल्यानंतर नागरिकांच्या आरोग्य उपचाराची जबाबदारी उपजिल्हा रुग्णालयाकडे वर्ग करण्यात आली होती. संबंधित आरोग्य विभागाने हा कार्यभार उपजिल्हा रुग्णालयाकडून काढून तालुका वैद्यकीय यंत्रणेकडे गेल्या वर्षभरापासून सोपविला आहे. आधीच या यंत्रणेवर कामाचा मोठा ताण आहे. त्यात शहराचा अतिरक्त भार त्यामुळे एवढय़ा लोकांना पुरेशी आरोग्य सुविधा पुरवितांना त्यांचा अक्षरश: नाकेनऊ येत असते. अशा विदारक परिस्थितीतही चांगल्या सुविधा देण्याचा प्रय} ही यंत्रणा करीत असते. शहरासाठी देण्यात आलेले हे पाच आरोग्य कर्मचारी महिन्यातून 25 वेळा बालकांची गरोदर मातांची नियमित तपासणी बरोबरच लसीकरण करीत असतात. याशिवाय आरोग्य विभागाचे इतर कार्यक्रमांची जनजागृती, अंमलबजावणीची कामे ही करतात. विशेषत: शहरात अशा कर्मचा:यांची आवश्यकता असताना एकही आशा कार्यकर्ती दिलेली नाही. उपजिल्हा रुग्णालयाचा कार्यकक्षेत तळोदा शहर येत असले तरी तेथील यंत्रणा अगदी आणिबाणीच्या वेळेसदेखील सहकार्य करीत नसल्याचा आरोप आहे. वाढीव कर्मचारी नियुक्तीबाबत सातत्याने वरिष्ठ आरोग्य प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. असे असूनही याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे आता याप्रकरणी नूतन लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.