शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

नॅायलॅान मांजा विक्री प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबारसह शहादा, चिंचपाडा व खांडबारा येथे नायलॅान मांजा विक्री करणा-यांवर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारसह शहादा, चिंचपाडा व खांडबारा येथे नायलॅान मांजा विक्री करणा-यांवर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हा दाखल केला. तसेच २२ हजारांचा मांजाही जप्त करण्यात आला आहे.नंदुरबार शहरातील जुने पोस्ट ॲाफीस भागात आनंद गोपाल जयस्वाल हे नॅायलाॅन मांजा विक्री करीत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून १० हजार १३० रुपयांचा मांजा जप्त केला. तसेच कोरीट नाका परिसरात सोनू उर्फ पंकज कैलास निकुंभ हे देखील नॅायलॅान मांजा विक्री करीत असतांना त्यांच्याकडून साडे चार हजार रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला. याबाबत पोलीस कर्मचारी राहुल पांढारकर व अभय राजपूत यांनी फिर्याद दिल्याने शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा येथे भोई गल्ली परिसरात सुनील अशोक वाडीले यांच्याकडे विक्रीसाठी असलेले दोन हजार ७०० रुपयांचा नॅायलॅान मांजा आढळून आला. पोलीस कर्मचारी शोएबशेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.चिंचपाडा, ता.शहादा येथे चेतन रमेश परदेशी हे बाजार परिसरात नॅायलॅान मांजा विक्री करीत होते. त्यांच्याकडून चार हजार ५६० रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला. याबाबत पोलीस कर्मचारी जितेंद्र सोनवणे यांनी फिर्याद दिल्याने नवापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला. खांडबारा येथे मुख्य बाजारात अलतमाश रफीक मेमन हा मांजा विक्री करतांना आढळून आला. त्याच्याकडून दोन हजार ३०० रुपयांचा नॅायलॅान मांजा जप्त करण्यात आला. याबाबत पोलीस कर्मचारी राजेंद्र काटके यांनी फिर्याद दिल्याने विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नॅायलॅान मांजा विक्री करण्यास शासनाने प्रतिबंध केला असून तो विक्री करू नये. विक्री करतांना आढळून आल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.