शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पहिल्याच पावसात नदी नाल्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात मान्सून सक्रीय झाला असून, बुधवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास सर्वत्र कमी अधिक प्रमाणात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात मान्सून सक्रीय झाला असून, बुधवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. विशेषत: शहादा आणि तळोदा तालुक्यातील काही भागात या पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे तर काही भागात शेतशिवारात पाणी शिरल्याने शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे.शहादा तालुक्यातदुबार पेरणीचे संकटशहादा तालुक्यात बुधवारी पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याने नदी-नाले ओसंडून वाहत होते तर शेतांमध्ये गुडघ्या एवढं पाणी साचल्याने खरीप हंगामातील कापूस, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊन ठेपले आहे.अगोदरच कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील नुकसानीस सामोरे जावे लागलेले आहे. खरीप हंगामातील पिकांची पेरणी केल्यानंतर तिसºया व चौथ्या दिवशी झालेल्या पावसाने शेतकरी कर्जाच्या खाईत बुडाला आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करून शेतकºयांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी होती. या दरम्यान अनेक शेतकºयांच्या रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे गव्हाला अपेक्षा पेक्षा कमी भाव मिळाला असून, मका, ज्वारी व कापूस आदींचे उत्पन्न कमी झाले असून, त्यास योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी नाराज झाला आहे. या दोन महिन्याच्या कालावधीनंतर खरीप हंगामाला सुरूवात करण्यात आली आहे. यासाठी अनेक शेतकºयांनी सहकारी सोसायटीतून कर्ज घेत बी-बियाणे व खतांची खरेदी करून पीक पेरा केला आहे.बुधवारी पहाटे झालेल्या पावसाने शेतकºयांचा खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तिखोरा, भादा, पिंगाणे, अवघे-जुनवणे, कलसाडी, परिवर्धा, म्हसावद, पिंपरी, सोनवल, तºहाडी यासह अनेक गावांना झालेल्या पावसामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाबा-काठोडा व प्रकाशा मार्गावरील शेतातील पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक सकाळी १० वाजेपर्यंत बंद होता.रांझणीत वीजतारांवर वृक्ष पडल्याने वीजपुरवठा खंडीतरांझणी, ता.तळोदा परिसरात मंगळवारी पुन्हा रात्री वारा वादळासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने हवेत काहीसा गारवा निर्माण झाल्याचे असून, खरीप पेरणींना वेग येणार आहे. दरम्यान, या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडली. तसेच शेत शिवारात पूरसदृष्य पाण्याचे प्रवाहाची दिशा बदलत बांध फोडत शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.रांझणी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ वृक्ष विद्युत तारांवर पडल्याने परिसरातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. या वेळी ग्रामपंचायतीने जेसीबी मागवून झाड बाजूला केले. यानंतर वीज वितवरण कंपनीच्या कर्मचाºयांनी बुधवारी युद्ध पातळीवर काम करीत वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला.या वेळी शेतकºयांकडून कापूस व मिरची लागवड मोठ्या प्रमाणावर उरकवण्यात आली असली तरी आता शेतकरींकडून ज्वारी, तूर, सोयाबीन यांचीही पेरणी पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. दरम्यान शाळा व महाविद्यालये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने शेतकºयांना आपापल्या पाल्यांची कापूस, मिरची लागवडीसह इतर कामात मोलाची मदत मिळत असल्याने मजुरी वाचत आहे. या वर्षी प्रथमच मान्सूनचा पाऊस वेळेवर बरसल्याने शेतकºयांमध्ये सधानाचे वातावरण आहे. काही शेतकºयांनी खरीप पेरणीची तयारी पूर्वीच केल्याने लवकरच पेरणीला गती मिळणार असल्याचे चित्र आहे.

सुसरी नदीच्या पुरात सामान वाहून गेलेलोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यात मान्सूनच्या पावसाने दमदार सलामी देत रात्री अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे मान्सुनच्या पहिल्याच दिवशी सर्वत्र पाणीच पाणी पहायला मिळाले. सातपुड्यातील दऱ्या खोºयातून वाहत येणाºया नद्याना पुर आल्याने तालुक्यातील बहुतांशी नदीनाले प्रवाहीत झाले आहेत. दरम्यान तोरणमाळ घाटात किरकोळ दरड कोसळून रस्त्यावर आली आहे. परंतु त्याचा वाहतुकीवर परिणाम झालेला नाही.मंगळवारी रात्री ब्राह्मणपुरी परिसरात दमदार पावसाने आगमन केले. या पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून, सकाळी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना शेती मशागतीची कामे थांबवावी लागली. पहिल्याच दिवशी पावसाने पाणीच पाणी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.शहादा तालुक्यातील बहुतांशी नदीनाले प्रवाहीत झाले आहेत. मंगळवारी रात्री सुरू झालेला मुसळधार पाऊस बुधवारी पहाटे चार वाजेपर्यंत बरसत होता. यामुळे शेतशिवारात पाणी साचून तलावाचे स्वरूप आल्याचे दिसून आले. तसेच तोरणमाळ घाटात किरकोळ प्रमाणात रस्त्यावर लहान लहान दगड कोसळले. मात्र त्याचा वाहतुकीवर काहीच परिणाम झालेला नाही. जूनच्या सुरूवातीपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत होता. त्यामुळे काही शेतकºयांनी खरीपाच्या बहुतांशी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. आता मान्सूनचे दमदार आगमन झाल्यामुळे मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.दरम्यान, कोळदा ते खेतिया रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने शहादा तालुक्यातील दरा फाटा नजीक असलेल्या सुसरी धरणाजवळ दुहेरी पुलाचे काम सुरू आहे. सातपुड्यातील दºया खोºयातून वाहून येणाºया सुसरी नदीला पहाटे अचानक पुर आल्याने दरा फाटा नजीक सुसरी धरणाजवळ पुलाचे काम सुरू असल्याने याठिकाणी असलेले साहित्य व मशनरी पाण्याच्या प्रवाहात ३० ते ४० फुट अंतरापर्यंत वाहून गेल्याचे दिसून आले.