गाडगेबाबा स्वच्छता अभियनांतर्गत कोठली प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:43 IST2019-08-14T12:43:03+5:302019-08-14T12:43:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत 2018-19 या वर्षातील जिल्हास्तरीय पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत़ ...

गाडगेबाबा स्वच्छता अभियनांतर्गत कोठली प्रथम
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत 2018-19 या वर्षातील जिल्हास्तरीय पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत़ यात कोठली ता़ नंदुरबार या गावाला प्रथम पुरस्कार जाहिर झाला आह़े
जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कक्षाकडून नुकत्याच या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली़ यात जिल्ह्यातून कोठली प्रथम, लहान कडवा ता़ नवापुर व पुरुषोत्तमनगर ता़ शहादा यांना विभागून द्वितीय तर देवमोगरा ता़ नवापुर या गावाला तृतीय क्रमांकाचे बक्षिस घोषित करण्यात आले आह़े पारितोषिकांचे वितरण 15 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता पोलीस कवायत मैदानावर होणा:या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याहस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आह़े निवड झालेल्या गावांनी वर्षभर स्वच्छ भारत अभियनांतर्गत राबवलेल्या कार्यक्रमांचे निरीक्षक करुन त्याचे मूल्यांकन होऊन पुरस्कार जाहिर झाले आहेत़