नंदुरबार : सातपुड्यातील तीनसमाळ परिसरातील वनक्षेत्राला आग
By भूषण.विजय.रामराजे | Updated: March 2, 2023 18:51 IST2023-03-02T18:51:19+5:302023-03-02T18:51:58+5:30
ग्रामस्थ, वनविभाग आणि वनसंरक्षण समितीच्या सदस्यांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला.

नंदुरबार : सातपुड्यातील तीनसमाळ परिसरातील वनक्षेत्राला आग
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील सातपुड्याच्या अतीदुर्गम भागात स्थित असलेल्या तिनसमाळ परिसरात वनक्षेत्राला आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता ही आग दिसून आल्यानंतर ग्रामस्थ, वनविभाग आणि वनसंरक्षण समितीच्या सदस्यांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला.
सातपुडा डोंगर रांगेत लिमगव्हाण भागात सकाळी ११ वाजेच्या सुमारास धुर दिसून आला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी ही माहिती वनविभागाला दिली. ही आग लावली किंवा वणवा पेटला, याचा शोध घेेणे आवश्यक आहे. आठ दिवसांपूर्वी या भागात एकदा आग लागल्याची माहिती देण्यात येत आहे. आगीत गवत, वनस्पती आणि मोठ्या आकाराच्या सागाच्या झाडांचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी झाडांचे संवर्धन होण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करुन सीसीटीचे कामही केले आहे. दरम्यान वनक्षेत्रातील नुकसानीचा आढावा वनविभागाकडून घेतला असून लाखो रुपयांची झाडे जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.