शेवटी नागरिकांना बुजवावे लागताहेत खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:22 PM2019-09-20T12:22:54+5:302019-09-20T12:23:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात खराब रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी नागरिक पुढे येत असून त्यांच्याकडून श्रमदानातून ...

Finally the citizens have to extinguish the pits | शेवटी नागरिकांना बुजवावे लागताहेत खड्डे

शेवटी नागरिकांना बुजवावे लागताहेत खड्डे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात खराब रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी नागरिक पुढे येत असून त्यांच्याकडून श्रमदानातून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात येत आह़े यामुळे एकीकडे खड्डे बुजवले जात असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते दुरुस्तीबाबतची उदासितना प्रकर्षाने समोर येत आह़े
 कुकावल ता़ शहादा
शहादा - शिरपूरदरम्यान ब:हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून दररोज अपघात घडत आहेत़ खड्डय़ांमुळे काहींना मणक्यांच्या त्रास सुरू झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली नसल्याने कुकावल ता. शहादा  येथील तरुणांनी स्वखर्चाने साईडपट्टय़ा व खड्डे भरण्याचे काम सुरु केले. कुकावल शहादा दरम्यान काही महिन्यांपूर्वीच रस्त्याचे नूतनीकरण, डागडुजी करण्यात आली होती.परंतु निकृष्ट कामाचे पितळ पावसामुळे उघडे पडले होत़े रस्त्यावर गुडघ्या एवढे खड्डे झाल्याने दररोज किरकोळ अपघात होत आहेत. दोन दिवसांपूर्वीच याठिकाणी ट्रक उलटल्याची घटना घडली होती़ सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही़  वारंवार होणा:या अपघातांना अटकाव व्हावा, यासाठी कुकावल येथील  जितेंद्र देसले, रज्जाक पटेल, संजय कोळी, अक्षय गवळे, नानूभाऊ भील या युवकांनी स्वयंस्फूर्तीने खड्डे बुजवण्याचे व साईड पट्टी भरण्याचे काम सुरू केल़े यावेळी सरपंच प्रतिनिधी राहुल सनेर उपस्थित होते. दरम्यान या मार्गावरील खड्डे कायम धोकेदायक ठरत आहेत़ मार्गावरुन अवजड वाहने मोठय़ा संख्येने जात असल्याने रस्ताच टिकाव धरत नसल्याने दिसून आले आह़े 
मार्गावरुन प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे झाले असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत़ गेल्यावर्षीही या मार्गावर खड्डय़ामुळे एकाचा बळी गेला होता़  त्यावेळी एका मजुराने खड्डा बुजवत सामाजिक दायित्त्व निभावले होत़े 
ऐचाळे 
ऐचाळे येथील नूतन माध्य व उच्च माध्य माध्यमिक विदयालयाच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी ऐचाळे येथील रस्त्यावर मोठमोठे खड्डे बुजवल़े शिक्षक व विद्याथ्र्यानी म्हसोबा नाला ते ऐचाळे गावार्पयतचा एक किलोमीटरच्या अंतरात माती व इतर साहित्य टाकून भराव करुन दिला़ यावेळी शिक्षक विजय शामराव साबळे व अनिल साहेबराव पाटील यांनीही श्रमदान केले.
 

Web Title: Finally the citizens have to extinguish the pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.