नंदुरबार : आदिवासी विकास विभागात टेंडर मिळवून देण्याचे आमीष दाखवून नंदुरबारातील एकाची २० लाखात फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी अमरावती येथील दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमरावती येथील मुदस्सर अली व मुतराज अली यांनी नंदुरबारातील व्यापारी अशोक वसंतलाल चौधरी यांना टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते.आदिवासी विकास महामंडळात आपल्या ओळखी असून विविध वस्तू पुरवठ्याचे टेंडर सहज मिळवून देत असल्याचे सांगून चौधरी यांचा विश्वास संपादन केला. त्यासाठी मे २०१६ मध्ये त्यांच्याकडून या दोघांनी २० लाख रुपये घेतले. परंतु दोन वर्षात कुठलेही टेंडर मिळाले नाही. चौधरी व त्यांचे व्यापारी साथीदार पैसे मागण्यास गेले असता शिविगाळ व धमकी देवून त्यांना परत पाठविण्यात आले.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर चौधरी यांनी नंदुरबार शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबारच्या व्यापाऱ्याची २० लाखात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 18:20 IST
आदिवासी विकास विभागात टेंडर मिळवून देण्याचे आमीष दाखवून नंदुरबारातील एकाची २० लाखात फसवणूक करण्यात आली.
नंदुरबारच्या व्यापाऱ्याची २० लाखात फसवणूक
ठळक मुद्देअमरावतीच्या दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हाआदिवासी विकास विभागाचे टेंडर मिळवून देण्याचे आमिषनंदुरबार शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल