शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

वन्यप्राण्यांपेक्षा अफवांच्या बाजाराने ग्रामीण भागात भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:45 PM

नंदुरबार : दुष्काळाने होरपळ सुरु असलेल्या नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात ग्रामस्थांना हिंस्त्र प्राणी गाव शिवारात फिरत असल्याचे निरोप मिळत ...

नंदुरबार : दुष्काळाने होरपळ सुरु असलेल्या नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात ग्रामस्थांना हिंस्त्र प्राणी गाव शिवारात फिरत असल्याचे निरोप मिळत आहेत़ यातून भिती निर्माण होऊन शेतशिवारात शिल्लक असलेली कामेही होत नसल्याने संकट अधिक गडद होत आह़े मांजरे येथे गेल्या 15 दिवसांपूर्वी शेळी आणि गाय ठार करत बिबटय़ाने अस्तित्व दर्शवून दिले होत़े यानंतर वनविभागाने पंचनामा करत गस्तही सुरु केली होती़ या प्रकारानंतर वनविभाग गस्त करत असताना कोपर्ली, मांजरे, खोंडामळी, आराळे, शनिमांडळ, रनाळे, वडबारे, निंभेल, रजाळे, बलवंड, सैताणे आणि आखातवाडे या भागात वन्यप्राणी फिरत असल्याच्या अफवांना पेव फुटले आह़े सायंकाळी शेतशिवारात हिंस्त्र प्राणी पाहिले गेल्याचे दावे केले गेल्याने शेतक:यांमध्ये भिती निर्माण झाली आह़े यामुळे नंदुरबार वनविभागाची एकच धावपळ सुरु असून वनविभागाचे कर्मचारी संपूर्ण तालुका पिंजून काढत आहेत़ गेल्या तीन दिवसात पूर्व भागातील गावांमध्ये तरसाचे झुंड फिरत असल्याची माहिती दिली गेल्यानंतर सहा जणांच्या गस्तीपथकाने फेरी करुनही त्यांच्या हाती काहीच लागले नाही़ हीच स्थिती तालुक्याच्या तापीकाठालगत असलेल्या गावशिवारात आह़े  सातत्याने वाढत असलेल्या अफवांमुळे शेतशिवारातील कांदाचाळींचे सरंक्षण करण्यासाठी रखवालदार आणि तुरळक प्रमाणातील रब्बी शेतीकामांसाठी मजूर मिळत नसल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े या भागात साधारण रब्बी ज्वारी पेरणीसह कांदा बियाणे तयार करण्याची कामे करण्यात येत आहेत़ परंतू वन्यप्राण्याचा संचार असल्याच्या अफवेने ही कामे करण्यासाठी मजूर मिळत नसल्याचे चित्र आह़े दरम्यान अफवा वाढू नये यासाठी वनविभागाचे सहायक वनसंरक्षक जी़आऱरणदिवे, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज रघुवंशी यांनी कोपर्ली येथे भेट देत ग्रामपंचायतीत बैठक घेतली़ यावेळी दोन्ही अधिका:यांनी येथील नागरिकांसोबत संवाद साधून बिबटय़ा किंवा इतर वन्य प्राणी दिसल्यास करावयाच्या उपाययोजनांची माहिती देत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितल़े येत्या काळात प्राण्यांचा संचार सुरु होण्याची भिती यावेळी काही ग्रामस्थांनी बोलून दाखवली होती़ नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ, ठाणेपाडा, पावला, आंबेबारा, धनीबारा, वावद, वासदरा लघुप्रकल्पाच्या जवळपास असलेल्या विविध गावांमध्ये वन्यप्राणी फिरत असल्याचा दावा करण्यात आला होता़ ग्रामस्थांकडून सायंकाळनंतर वन्यप्राणी पाहिल्याची माहिती दिल्यानंतर गस्तीला सुरुवात करण्यात आली आह़े तालुक्यात तरस आणि बिबटय़ाचा संचार असल्याचे सांगण्यात येत असले तरी तालुक्यात केवळ एकाच ठिकाणी बिबटय़ा दिसून आल्याची माहिती आह़े शनिमांडळ परिसरातील लघुप्रकल्प कोरडे झाल्याने या भागात वन्यप्राणी फिरत असल्याच्या निव्वळ अफवा असल्याचे वनविभागाचे म्हणणे आह़े