फौजदारासह पोलिसाला जमावाची बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 12:40 IST2019-01-20T12:39:50+5:302019-01-20T12:40:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पोलीस पाटील पदावरून दोन गटात सुरू असलेला वाद मिटविण्याचा प्रय} करणा:या फौजदार व पोलीस ...

Fierce assault of the police force with the army and the police | फौजदारासह पोलिसाला जमावाची बेदम मारहाण

फौजदारासह पोलिसाला जमावाची बेदम मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पोलीस पाटील पदावरून दोन गटात सुरू असलेला वाद मिटविण्याचा प्रय} करणा:या फौजदार व पोलीस कर्मचारी यांना जमावाने मारहाण केल्याची घटना उर्मिलामाळ, ता.अक्कलकुवा येथे घडली. जमावाने पोलीस वाहनाची देखील तोडफोड केली. मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
किर्ती मारगण्या वळवी, भिका मारगण्या वळवी, वन्या मारगण्या वळवी, बोंडा समशा वळवी, मांगठा समशा वळवी, जान्या दोह:या वळवी व इतर आठ ते दहाजण असे संशयीतांची नावे आहेत. पोलीस सूत्रांनुसार, उर्मिलामाळ येथील नव्याने नियुक्त पोलीस पाटील व गावातीलच किर्ती मारगण्या वळवी यांच्यात 188 रोजी रात्री वाद झाला. यावेळी मोलगी पोलिसांची पेट्रोलिंग करणारे वाहन तेथे पोहचले. फौजदार हर्षल बागल व पोलीस शिपाई बापू शेमले यांनी तेथे जावून जमावाला समजविण्याचा  प्रय} केला. गैरसमज करून किर्ती वळवी व त्याच्या साथीदारांनी फौजदार बागल व शिपाई शेमले यांना बेदम मारहाण केली.
पोलीस व्हॅनवर देखील दगडफेक करून व्हॅनचे नुकसान केले. याबाबत पोलीस शिपाई बापू शेमले यांनी फिर्याद दिल्याने सरकारी कामात अडथळा आणने यासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक पी.सी.सोनवणे करीत आहे. 

Web Title: Fierce assault of the police force with the army and the police