शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

केमिकलचा टॅंकर उलटल्याने भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील तळोदा शहाराबाहेरील बायपासलगत ऍसिडने भरलेला भरधाव ट्रक पलटी झाला.या अपघातात टँकरचे ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील तळोदा शहाराबाहेरील बायपासलगत ऍसिडने भरलेला भरधाव ट्रक पलटी झाला.या अपघातात टँकरचे मोठे नुकसान झाले असून ट्रक चालकाला डोक्याला मार लागला आहे.    याबाबत अधिक माहिती अशी की,गुजरात राज्यातील दहेज (जि भरुच) येथून एचसीएल ॲसीड भरून ट्रॅन्कर (क्रमांक आर जे ०९ जी सी ७९०५) हा महाराष्ट्रातील बल्लारशहा (जि.चंद्रपूर) येथे जात होता. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तळोदा शहरातील वळण रस्तावरुन पुढे जात असताना समोर अचानक जीप आली. जीपला होणारी धडक टाळण्याच्या प्रयत्नात टॅंकर    चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रॅन्कर रस्तालगतच्या खड्यात उलटले. त्यामुळे पेट घेतला.     या अपघात टॅंकरचालक  सूरज बैरागी (३५) रा. उज्जैन  याला डोक्याला मार लागला. स्थानिकांनी त्याला तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याला डोक्याला मार लागला आहे. टँकरचा मोठे नुकसान आले असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. ॲसीड गळतीने परिसरात तीव्र दुर्गंध पसरत होता.      केमिकलचा  टँकर उलटल्याची माहिती प्रशासनाला झाल्यानंतर प्रशासनाने घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक नंदराज पाटील यांनी स्वतः भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. टँकरमधील केमिकल ज्वलनशील नसल्याची त्यांनी खात्री करून घेतली.तहसीलदार गिरीश वखारे यांनी देखिल तलाठी बी डी चाटे यांना घटनास्थळी पोहचुण परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश दिले.         दरम्यान हे अपघात स्थळ नागरी वसाहती जवळ असल्याने नागरी वस्तीत केमिकलची दुर्गंधी अनुभवास येत होती. केमिकलचे टँकर नागरी वसाहती जवळ उलटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून आले. मात्र प्रशासनाने वेळीच घटनास्थळी धाव घेत त्याबाबत शहानिशा केली.