शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळे मिटेल"; मुजोर अग्रवालची पोलिस आयुक्तालयातच पत्रकारांना धमकी
2
आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती
3
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
4
आजचे राशीभविष्य: कामे निर्विघ्नपणे होतील, अचानक धनलाभ योग; अलौकिक अनुभूती लाभेल
5
रोहितच्या MI ने जे दोनदा करून दाखविले ते SRH ला जमेल का? आज क्वालिफायर २ सामना, फायनल जिंकेल का...
6
"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात
7
१ वर्षांनी अद्भूत राजयोग: ६ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, पद-पैसा वाढेल; संपत्तीत शुभ-लाभ!
8
खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय
9
अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका
10
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
11
पाकची ताकद किती? हे पाहण्यासाठी लाहोरला गेलो; मणिशंकर यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांचे प्रत्युत्तर 
12
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
13
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
14
काँग्रेसला ४० जागा मिळणेही अवघड आहे; पाच वर्षांत पाच पंतप्रधान बघावे लागतील - शाह
15
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
16
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
17
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
18
भाजपमुळे बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाईने जनता त्रस्त - प्रियांका गांधी
19
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
20
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले

मुलगा सांभाळ करीत नसल्याने बापाची फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:58 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुलगा व सून सांभाळ करीत नाही. वृद्धपकाळात काळजी घेत नाही. त्यामुळे आपला छळ होत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुलगा व सून सांभाळ करीत नाही. वृद्धपकाळात काळजी घेत नाही. त्यामुळे आपला छळ होत असून आपल्या जिवाला व मालमत्तेला धोका असल्याची फिर्याद बापाने मुलाविरुद्ध दिली. शहर पोलिसात नव्या अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल झाला आहे. निळकंठ नथ्थू साळी, रा.गांधीनगर, नंदुरबार असे वृद्धाचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मुलगा सुनील साळी व त्यांची प}ी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. निळकंठ साळी हे 89 वर्ष वयाचे आहेत. त्यांचे स्वमालकीचे घर गांधीनगरमध्ये आहे. घरात मुलगा व सून हे निळकंठ साळी यांना नेहमीच त्रास देतात. भोजन, निवारा, देखभाल, औषधोपचार करीत नाही. निर्वाहाबाबत कुठल्याही प्रकारची काळजी घेत नाहीत. नेहमीच अंगावर धावून जाणे आणि शिविगाळ करणे असे प्रकार केले जातात. त्यामुळे आपल्या जिवीतास व मालमत्तेला देखील धोका असल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्था यांच्यामार्फत त्यांनी फिर्याद दिली. त्यावरून मुलगा व सून यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार वळवी करीत आहे.