पिता-पुत्राचा एक दिवसाच्या अंतराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:29 IST2021-04-11T04:29:47+5:302021-04-11T04:29:47+5:30

याबाबत वृत्त असे की, राणीपूर, ता.तळोदा येथील हारसिंग रावल्या वळवी (८०) यांना कोरोनाचा त्रास सुरू झाल्याने नंदुरबार येथे जिल्हा ...

Father and son die one day apart | पिता-पुत्राचा एक दिवसाच्या अंतराने मृत्यू

पिता-पुत्राचा एक दिवसाच्या अंतराने मृत्यू

याबाबत वृत्त असे की, राणीपूर, ता.तळोदा येथील हारसिंग रावल्या वळवी (८०) यांना कोरोनाचा त्रास सुरू झाल्याने नंदुरबार येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच ८ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा प्रेमराज हारसिंग वळवी यांच्यावरही तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू होते. वडिलांच्या मृत्यूची बातमी त्यांना कळाली. हा धक्का प्रेमराज यांना सहन न झाल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ एप्रिल रोजी त्यांनीही इहलोकीचा निरोप घेतला.

हारसिंग वळवी हे शांत व मनमिळावू स्वभावाचे होते. गावात आश्रमशाळा सुरू व्हावी यासाठी शाळेला जागा मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या पश्चात चार मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रेमराज वळवी यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन भाऊ असा परिवार आहे. पं.स.चे माजी सदस्य सांगदेव वळवी यांचे हारसिंग वळवी वडील तर प्रेमसिंग वळवी भाऊ होत. पिता-पुत्राचा एक दिवसाच्या अंतराने कोरोनाने मृत्यू झाल्याने राणीपूरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Father and son die one day apart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.