शेती साहित्य चोरी व तोडफोडीने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 11:49 AM2020-06-04T11:49:25+5:302020-06-04T11:49:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील मोड व बोरद शिवारात शेतकऱ्यांच्या शेती साहित्य चोरीसह तोडफोडीच्या घटना घडत आहेत़ ...

Farmers suffer from theft and vandalism of agricultural inputs | शेती साहित्य चोरी व तोडफोडीने शेतकरी त्रस्त

शेती साहित्य चोरी व तोडफोडीने शेतकरी त्रस्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यातील मोड व बोरद शिवारात शेतकऱ्यांच्या शेती साहित्य चोरीसह तोडफोडीच्या घटना घडत आहेत़ ३१ मे पासून हा प्रकार सुरु असून बुधवारीही चोरीची घटना घडली आहे़ यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे़
३१ मे ते २ जून या काळात मोड व बोरद परिसरातील काशीनाथ श्रीपत चौधरी, अरविंद मोहन पाटील, संजय मोहन पाटील, दरबार राजपूत, विजयसिंग राजपूत, श्रीपत संभू पाटील, छोटू चौधरी, श्रीपत चौधरी आदी ३० ते ३५ शेतकºयांच्या शेतात टाकलेल्या ठिबक नळ्या, पीव्हीसी वॉल, मेनस्विच फ्यूज, कटआऊट, केबल सर्व्हिस वायर आदी चोरीचे प्रकार घडले आहेत़ चोरी दरम्यान चोरट्यांकडून पाईपची तोडफोड, बोर्डाची नासधूस तसेच वीज वितरण कंपनीची तार कापून चोरी करुन नेल्याचेही दिसून आले आहे़ यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत़ दरम्यान या प्रकारावर कारवाई व्हावी या मागणीसाठी शेतकºयांनी तळोदा पोलीस ठाणे गाठले होते़ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिंगटे यांना याबाबत माहिती देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे़ पोलीस निरीक्षक शिंगटे यांनी या भागात रात्रगस्त करुन चोरट्यांवर चाप बसवणार असल्याचे सांगितले आहे़

दरम्यान या प्रकारावर मात करण्यासाठी ग्रामीण भागात स्वतंत्र पोलीस पथक निर्माण करण्याची मागणी शेतकºयांची आहे़ या भागात दर दिवशी होणाºया चोरीच्या प्रकारासह खरीप आणि रब्बी हंगामात पिकांची चोरी आणि आगी लावण्याचे प्रकारही वाढले आहेत़ या भागातील ही समस्या निकाली काढण्यात यावी अशी मागणी आहे़ तळोदा तालुक्यात परप्रांतातून चोरट्यांच्या टोळ्या येत असाव्यात असाही शेतकºयांचा अंदाज आहे़

Web Title: Farmers suffer from theft and vandalism of agricultural inputs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.