शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : मागील आठवड्यात पावसनाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे तळोदा तालुक्यातील शेतशिवारात पेरणीच्या कामाला वेग आला असून ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : मागील आठवड्यात पावसनाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे तळोदा तालुक्यातील शेतशिवारात पेरणीच्या कामाला वेग आला असून पिकांसाठी खत घेण्यासाठी शेतकरी दुकानांवर गर्दी करीत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनच्या फटक्यामुळे नंतर सहज खत उपलब्ध होणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.गेल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतशिवारात पेरणीच्या व मशागतीच्या कामांना शेतकºयांनी वेग दिला आहे. अनेक शेतकºयांनी ऊस, केळी, कापूस, सोयाबीन, कडधान्य, भाजीपाला आदी पिकांची लागवड केली आहे. पिकाची वाढ व पोषण होण्यासाठी पिकाला वेळेवर खत देणे महत्त्वाचे असते. त्यामुळे वेळेवर खत उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील शेतकºयांच्या चिंता वाढल्या होत्या. त्यातच खरेदी-विक्री संघाने खत उपलब्ध करून दिल्याने खत खरेदी करण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहेत. खतटंचाई व लॉकडाऊनची भीती लक्षात घेता खत उपलब्ध असताना जास्तीत जास्त खत खरेदी करण्यासाठी शेतकºयांकडून प्राधान्य देण्यात येत आहे. त्यात युरियाचा तुटवडा भासत आहे. कोरोना महामारीचा फटका मोठ-मोठ्या उद्योगांना बसला आहे. याला खतांच्या कंपन्याही अपवाद राहिल्या नाहीत. कंपन्यांमध्ये खत निर्मिती, वाहतूक व अन्य प्रक्रियेसाठी मजूर टंचाई भासत असल्याने युरिया खत येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकºयांची गैरसोय होत असून जेवढे उपलब्ध होईल तेवढे खत मिळविण्यासाठी शेतकºयांची धडपड दिसून येत आहे. आधीच लॉकडाऊन, वादळ यासारख्या अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करणाºया बळीराजाला पुढील काळात युरिया व अन्य अत्यावश्यक खते आवश्यक प्रमाणात व वेळेवर पुरविण्याचे प्रयत्न कृषी विभागाकडून केले जात आहेत.दरम्यान, खते खरेदी करण्यासाठी तळोदा खरेदी-विक्री संघासमोर तालुक्यातील शेतकºयांच्या भल्या मोठया रांगा लागत आहेत. तळोदा शहरात कोरोनाचे सात रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने शहरातील बाजार व सर्व व्यापारी प्रतिष्ठाने पाच दिवस बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. त्यात कृषी क्षेत्रातील आस्थापने व दुकाने सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता शेतकºयांनी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करून खत खरेदी करणे गरजेचे आहे. कृषी विभागामार्फत शेतकºयाला शेताच्या बांधावर खत पुरविण्यात येण्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले जात आहे. खत खरेदी करण्यासाठी शेतकºयांनी दुकानावर मोठया प्रमाणात गर्दी करू नये. दुकानावर खत खरेदी दुकानांवर जाताना शेतकºयांनी स्वत:ची काळजी घेत सर्व प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे.