शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उपसा योजनांबाबत शेतक:यांची चेष्टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 13:36 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तापीवरील बॅरेजेस प्रकल्प पूर्ण होऊन 10 वर्षापेक्षा अधिक काळ झाला असला तरी या नदीवर सुमारे साडेसातशे कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले सारंगखेडा, प्रकाशा आणि सुलवाडे हे तिन्ही बॅरेज प्रकल्प केवळ नावालाच राहिले आहेत. या प्रकल्पांमधील पाणी शेतक:यांच्या शेतार्पयत पोहोचविण्यासाठी यापूर्वी झालेल्या उपसा योजना ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तापीवरील बॅरेजेस प्रकल्प पूर्ण होऊन 10 वर्षापेक्षा अधिक काळ झाला असला तरी या नदीवर सुमारे साडेसातशे कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले सारंगखेडा, प्रकाशा आणि सुलवाडे हे तिन्ही बॅरेज प्रकल्प केवळ नावालाच राहिले आहेत. या प्रकल्पांमधील पाणी शेतक:यांच्या शेतार्पयत पोहोचविण्यासाठी यापूर्वी झालेल्या उपसा योजना सुरू करण्याचे केवळ आश्वासनेच मिळत असल्याने सरकारने एकप्रकारे शेतक:यांची चेष्टाच सुरू केली आहे. विशेष म्हणजे गेल्या सात-आठ वर्षात दर चार-सहा महिन्यात मंत्री व वरिष्ठ अधिका:यांचे दौरे या बॅरेज प्रकल्पांच्या पाहणीसाठी होतात. त्या त्या वेळी आश्वासनांची खैरात होते पण अधिकारी व मंत्री केवळ पर्यटनासाठीच येथे येत असल्याचा सूर शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.तापी नदीवर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात 250 हेक्टरपेक्षा अधिक क्षमतेच्या 22 उपसा सिंचन योजना यापूर्वी सातपुडा साखर कारखाना व बँकांच्या पुढाकारातून राबविण्यात आल्या आहेत. या योजना 80 च्या दशकात पूर्ण झाल्या होत्या. त्यानंतर मात्र तापी नदीचे पात्र केवळ हंगामीच राहिल्याने योजना निकामी झाल्या होत्या. त्यासाठी सातत्याच्या पाठपुराव्यानंतर तापी विकास महामंडळाची स्थापना झाली. या महामंडळाअंतर्गत सारंगखेडा, प्रकाशा आणि सुलवाडे हे तीन बॅरेजेस बांधण्यात आले. जवळपास 700 कोटीपेक्षा अधिक खर्च त्यावर झाला आहे. याच महामंडळातर्फे संबंधित उपसा योजनाही ताब्यात घेण्यात आल्या. त्या सुरू करण्यासाठी गेल्या 10 वर्षापासून आश्वासने दिली जात आहेत. विशेषत: बॅरेज प्रकल्पांची सुरुवात तत्कालिन युती सरकारच्या काळात झाली होती. पण ते आघाडी सरकारच्या काळात पूर्ण झाले. तेव्हा भाजप विरोधी पक्षात असताना खान्देशचे नेते व पदाधिका:यांनी हा प्रश्न लावून धरला होता. तत्कालिन उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री अजित पवार यांनीही त्याबाबत चालना दिली होती. पुढे राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर खान्देशच्या पहिल्याच दौ:यात मुक्ताईनगर येथे या उपसा योजनांसाठी 41 कोटींच्या निधीची घोषणा केली होती. त्यानंतर तीन वर्षे फारशा हालचाली               झाल्या नाहीत. सातत्याच्या शेतक:यांच्या मागणीनंतर योजनांचे पुनजिर्वीत करण्यासाठी यांत्रिकी, विद्युतीकरण व बांधकाम असे                तिन्ही विभागातील निविदा            काढण्यात आल्या. या निविदांनाही सुरुवातीला अडथळे आले. पुढे त्यात दुरुस्ती होऊन नियमित झाल्या. ठेकेदारांना कामे दिली गेलीत. साधारणत: सहा महिन्यात ही कामे पूर्ण करायची होती. परंतु वर्ष उलटूनही काम धिम्या गतीने सुरू असून ही कामे कधी पूर्ण होतील याबाबत अद्याप तरी शाश्वती दिसत नाही. या पाश्र्वभूमीवर गेल्या वर्षभरात पालकमंत्री व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी बॅरेज प्रकल्पाची             पाहणी करून सहा महिन्यात             योजना पूर्ण करण्याचे आश्वासन            दिले होते. आता गेल्या आठवडय़ातच जलसंपदा विभागाचे मुख्य               अभियंता (यांत्रिकी) यांनीही बॅरेज प्रकल्पांची पाहणी केली. मात्र            त्यातून फारसे काही अपेक्षित              साध्य दिसून येत नाही. त्यामुळे अधिकारी आणि मंत्री या प्रकल्पांवर केवळ पर्यटनासाठी येत असतात, असा सूर आता शेतकरी वर्गातून उमटत आहे.गुरुवारी मंत्रालयात जलसंपदा विभागाचे सचिव सुव्रे यांच्या अध्यक्षतेखाली उपसा योजनांबाबत बैठक झाली. या बैठकीत बामखेडा, बिलाडी, पुसनद, दाऊळ-मंदाणे, निमगूळ, धमाणे येथील उपसा योजना 1 नोव्हेंबर्पयत सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बहुतांश योजना सुरू करण्यासाठी वीजपुरवठय़ाची अडचण असल्याचे सांगण्यात आले. विशेषत: या उपसा योजना पूर्वी सुरू होत्या त्यावेळी त्यांना जे वीज कनेक्शन देण्यात आले होते ते वीज कनेक्शन योजना बंद झाल्याने आता दुसरीकडे देण्यात आले होते. त्यामुळे सध्या योजना सुरू करण्यासाठी त्यांना जास्त दाबाचा वीजपुरवठा आवश्यक आहे. हा वीजपुरवठा सात योजनांसाठी देणे              शक्य असल्याचा अहवाल वीज कंपनीने दिला आहे. त्यानुसार त्या सात योजना 1 नोव्हेंबर्पयत सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी लागणारे यांत्रिकी साहित्य व जलवाहिन्या 15 ऑक्टोबर्पयत येणार असल्याने या योजना 1 नोव्हेंबर्पयत सुरू करणे शक्य असल्याचे विभागाचे म्हणणे आहे.