देवानंद नदीचा शेतक:यांना हंगामी आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:18 IST2019-11-22T12:18:18+5:302019-11-22T12:18:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदाच्या दमदार पावसांमुळे डाब ता. अक्कलकुवा येथे उगम पावणारी तथा नर्मदेची उपनदी देवानंद नदी ...

देवानंद नदीचा शेतक:यांना हंगामी आधार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : यंदाच्या दमदार पावसांमुळे डाब ता. अक्कलकुवा येथे उगम पावणारी तथा नर्मदेची उपनदी देवानंद नदी चांगली खळखळून वाहत आहे. त्यामुळे या नदी काठावरील अनेक शेतक:यांना रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी अनुकूूल वातावरण निर्माण झाले आहे. मुबलक पाणी असल्याने खरीपातील नुकसान भरुन काढण्यास आधारभूत ठरणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात तापी नदीचे मोठे खोरे असले तरी दुर्गम भागातील बहुतांश लहान-मोठय़ा नद्या नर्मदेच्या उपनद्या आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई (डाब) तर धडगाव तालुक्यातील देवबारा (मांडवी) अस्तंबा शिखरापासून मधला भाग हा नर्मदा नदीचे खोरे आहेत. या भागातील बहुतांश नद्या नर्मदेलाच मिळत आहे. त्यात डाब येथे उगम पावणा:या देवानंद व उदय या दोन मोठय़ा नद्या असून या नद्यांना परिसरातील लहान- मोठय़ा नाल्यांसह काही नद्याही मिळतात.
अच्या चढ-उताराच्या शिवाय कोरडवाहू शेती असल्यामुळे धडगाव व मोलगी भागात केवळ पावसाच्या पाण्यावरच शेती केल्या जातात. परंतु देवानंद व उदय नदी या नद्यांना अपेक्षेनुसार पाणी राहिल्यास या दोन्ही नदी काठावरील शेतकरी रब्बी हंगामात अल्प कालावधीची पिके घेतात. ही पिके घेण्यासाठी शेतक:यांमार्फत विशिष्ठ पाटचा:या तयार करण्याची पारंपरिक पद्धतींचा अवलंब करण्यात येत आहे. हीच पद्धत तेथील शेतक:यांना आधार देत असून डोंगर - टेकडय़ांमुळे अन्य यंत्रे फारसे उपयोगी नसल्याचे देखील दिसून येत आहे. देवानंद नदी ही अक्कलकुवा तालुक्यातील वाडीबार, बेडाकुंडल, भोरकुंड, जामली, उमटी, पिंवटी तर धडगाव तालुक्यातील वरखेडी, कुंडल, खांडबारा, हालीगव्हाण, सोन, भानोली, जालोला, कुकतार या गावांमधून वाहत असून चिंचखेडी येथे नर्मदा नदीला मिळत आहे. या नदीला टेंबला, खर्डा व मुंदलवड येथील नाल्यांपासून निर्मित मोजराची नदी खांडबारा तर भगदरी व मोलगी येथे उगम पावणारी कात्रीची नदी भानोली येथे जुळते.
डाबच्या जंगलातील बहुतांश नाले व देवानंद नदीला जुळतात व यंदा दमदार पाऊस झाल्यामुळे यंदा ही नदी खळखळून वाहत आहे. मुबलक पाणी असून या नदीकाठावरील शेतक:यांना रब्बी हंगामातील अल्प कालावधीची पिके घेण्यास आधारभूत ठरत आहे.
दुर्गम भागातील उदय व देवानंदसह कात्रीच्या खाट नदीत सर्वाधिक डांगर लागवड करण्यात येते. त्यात देवानंद नदीवर बेडाकुंड, भोरकुंड, उमटी, वरखेडी व कुंडल, खाट नदीत भगदरी, वेरी, कात्री तर उदय नदीतही काकरपाटीसह अनेक गावांमधील शेत:यांमार्फत डांगरमळे निर्माण करण्यात येत आहे. या मळ्यांसाठी कुठल्याही यंत्राची आवश्यकता भासत नाही. शिवाय पाण्याचा उपसाही करण्याची गरज नसते. केवळ पाण्याचा प्रवाह एकाच बाजुला वळविले जाते. त्यामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह कायम राहत असते. शिवाय रेतीत ङिारपून डांगर पिकांना देखील अपेक्षेनुसार पाणी मिळत असते.
काही जलतज्ञांमार्फत पर्यावरणाच्या रक्षणासाठी नदीचे पाणी वाहतेच राहणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येते. तर प्रत्येक जीवाला नदीतील पाण्याचा उपभोग घेण्यासाठी देखील पाणी वाहते राहणेच अपेक्षित आहे. त्यामुळे दुर्गम भागात नदीतील डांगरमळ्यांची संकल्पना ही पर्यावरणासह निसर्गातील प्रत्येक मानवापाठोपाठ पशु-पक्ष्यांनाही उपयुक्तच असावी, असे म्हटले जात आहे. म्हणून ही पद्धत सर्वाना समान न्याय देणारी ठरत आहे.