नापिकीला कंटाळून आसाणे येथे शेतक:याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 12:33 IST2018-09-14T12:32:58+5:302018-09-14T12:33:12+5:30

Farmer At Aasane Tarnish With Napki: Its Suicide | नापिकीला कंटाळून आसाणे येथे शेतक:याची आत्महत्या

नापिकीला कंटाळून आसाणे येथे शेतक:याची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील आसाणे येथे वाडिलोपाजिर्त शेतीत पिकत नैराश्य आलेल्या शेतक:याने आत्महत्या केली़ बुधवारी सायंकाळी शेतक:याने गळफास घेतला होता़ या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आह़े
योगेश पांडुरंग पाटील (28) असे मयत शेतक:याचे नाव आह़े मयत योगेश यांची आसाणे येथे वडिलोपाजिर्त शेती आह़े या शेतात गेल्या काही दिवसांपासून नापिकी आल्याने त्यांना नैराश्य आले होत़े शेतातील नापिकीमुळे कर्ज झाल्याने मानसिक तणावाखाली असलेल्या योगेश पाटील यांनी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास स्वमालकीच्या शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली़ 
याबाबत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सोनवणे करत आहेत़ नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील आसाणे येथे यंदाही दुष्काळसदृश स्थिती आह़े पावसाअभावी पिके जळाली आहेत़ 

Web Title: Farmer At Aasane Tarnish With Napki: Its Suicide