शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

पक्षांतराच्या राजकारणाला जिल्ह्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 10:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणुकीपूर्वीच व निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी         ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधानसभा निवडणुकीपूर्वीच व निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी              पक्षांतर केल्याने कार्यकत्र्यामध्ये संभ्रमीत वातावरण निर्माण झाले  होते. तथापि, पक्षांतर करणा:या नेत्यांना मात्र निवडणुकीत यश मिळाले नाही.निवडणूक जाहीर होण्यापूर्वी नवापुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत यांचे सुपुत्र व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. नवापूर मतदारसंघात भजपचा प्रभाव यापूर्वी फारसा नव्हता. त्यामुळे भरत गावीत यांच्या रुपाने पक्षाला सक्षम उमेदवार मिळाला होता. परंतु निवडणुकीत मात्र त्यांना यश मिळाले नाही. आतार्पयतच्या विधानसभा निवडणुकीत भरत गावीत यांना  अर्थात भाजपला याठिकाणी सर्वाधिक मते मिळाली पण विजय गाठता आला नाही. त्यामुळे याठिकाणी पक्षांतराच्या राजकारणाला अपयशच आले.माजी आमदार उदेसिंग पाडवी यांना भाजपने या वेळी उमेदवारी नाकारली. ते शहादा मतदारसंघातून पुन्हा भाजपतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. परंतु त्यांच्याऐवजी पक्षाने त्यांचे पुत्र राजेश पाडवी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले उदेसिंग            पाडवी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व आपला मतदारसंघ सोडून नंदुरबार मतदारसंघातून काँग्रेसतर्फे उमेदवारी केली. याठिकाणी भाजपचे डॉ.विजयकुमार गावीत यांच्याविरोधात प्रबळ उमेदवार देऊन काँग्रेसने आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. परंतु काँग्रेसच्या या प्रयत्नालाही यश लाभले नाही.माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांनीदेखील ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे शिवसेनेची जिल्ह्यातील एकमेव जागा असलेल्या अक्कलकुवा येथे पक्षाला फायदा होईल, असे गृहीत मानले जात होते. रघुवंशी यांनीदेखील अक्कलकुवा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमश्या पाडवी यांना विजयी करण्यासाठी पूर्णपणे प्रतिष्ठापणाला लावली होती. परंतु त्यांच्या प्रतिष्ठेला यश मिळाले नाही. मात्र शिवसेनेला अक्कलकुव्यात इतिहासात प्रथमच सर्वाधिक मताधिक्य मिळविण्यात ते यशस्वी झाले. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे नंदुरबार येथे भाजपचे उमेदवार डॉ.विजयकुमार गावीत यांना युतीमुळे फायदा झाला पण अक्कलकुव्यात मात्र पक्षाच्या उमेदवाराला यशार्पयत ते पोहचवू शकले नाहीत. आता भविष्याच्या राजकीय वाटचालीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.