शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

क्वॉरंटाईन सेंटरमध्ये सुविधा पुरविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबारातील तिन्ही क्वॉरंटाईन केंद्रांमधील स्थिती आणि समस्या याबाबत ‘लोकमत’मध्ये शनिवारी वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारातील तिन्ही क्वॉरंटाईन केंद्रांमधील स्थिती आणि समस्या याबाबत ‘लोकमत’मध्ये शनिवारी वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाने लागलीच उपाययोजना केल्या. तिन्ही इमारती सॅनिटाईज करण्यात आल्या तसेच पालिकेतर्फे स्वच्छता करण्यात आली.क्वॉरंटाईन सेंटरमध्ये कारागृहातील यातना मिळत असल्याच्या तक्रारी येथे राहणाऱ्यांनी केल्या होत्या. शिवाय आरोग्य देखील धोक्यात आल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.याची दखल घेत ‘लोकमत’ने शनिवार, ४ जुलैच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत प्रशासनाने शनिवारी सकाळीच उपाययोजनांना सुरुवात केली. तिन्ही सेंटरच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली. उघड्यावर पडलेला कचरा उचलण्यात आला. कचरा साठविण्यासाठी कचरा कुंडी ठेवण्यात आल्या.इमारतीचा आतील व बाहेरील परिसर सॅनिटाईज करण्यात आला. ज्या सेंटरमध्ये पाण्याची समस्या होती तेथे टँकर मागवून ती दूर करण्यात आली. सेंटर मध्ये असलेल्या लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. जेवनाचा दर्जा देखील चांगला ठेवण्याच्या सुचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. तापी व नर्मदा या इमारतीच्या सेंटरमध्ये टीव्हीचीही व्यवस्था करण्यात येत आहे.क्वॉरंटाईन सेंटरमधील समस्यांची दखल घेऊन वृत्त प्रकाशित करून आमच्या समस्यांना वाचा फोडल्याने सुविधा निर्माण झाल्याची भावना येथे असलेल्या अनेकांनी ‘लोकमत’जवळ दूरध्वनीद्वारे व्यक्त केली.