शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबारी येथे सीताबाई तडवी यांच्यावर अत्यंसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST

अंबाबारी येथे शेकडोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ग्रामस्थांनी दिवसभर चुली बंद ठेवून सीताबाईंना श्रध्दांजली वाहिली. सीताबाई ह्या विस्थापितांच्या ...

अंबाबारी येथे शेकडोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ग्रामस्थांनी दिवसभर चुली बंद ठेवून सीताबाईंना श्रध्दांजली वाहिली. सीताबाई ह्या विस्थापितांच्या प्रश्नासाठी शासन दरबारी लढत होत्या. त्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. अंत्ययात्रेत लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे, माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्यासह जिल्हाभरातून नागरिक सहभागी झाले होते.

दिल्ली येथे केंद्रशासनाच्या शेतकरीविरोधी कायदे मागे घेण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरीच आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात लोक संघर्ष मोर्चाचे जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. याच आंदोलनात आंबाबारी सीताबाई रामदास तडवी लोकसंघर्षतर्फे सहभागी होत्या. त्या कार्यकर्त्यांसह शाहजहाँपूर बॉर्डर वर आंदोलन करीत होत्या. प्रजासत्ताकदिनी झालेल्या परेडमध्येही त्या सहभागी झाल्या होत्या. परेड संपल्यानंतर त्या कार्यकर्त्यांसोबत गावाकडे येण्यासाठी निघाल्या होत्या. त्यातच रेल्वे स्थानकावर येताना त्यांचा अचानक मृत्यू झाला होता. गुरुवारी रात्री विशेष रुग्णवाहिकेने त्यांचा मृतदेह अक्कलकुवा तालुक्याकडे रवाना करण्यात आला होता. त्यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी अंबाबारी येथे आणल्यानंतर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सीताबाई यांच्या अचानक निधनाने ग्रामस्थांनी एक दिवसाचा उपवास करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. सीताबाई यांच्या पश्चात पती, मुलगा व चार मुली असा परिवार आहे.

सीताबाई यांना देशभसह संयुक्त किसान मोर्चा अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, जनआंदोलनांची संघर्ष समिती महाराष्ट्र आणि विविध राज्यातील किसान संघटनांकडूनही श्रद्धांजली वाहण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राजू शेट्टी, पालकमंत्री ॲड. के.सी. पाडवी, सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, गजानन खातू पूर्णिमा, चिकरमाने सुभाष वारे यांनीही शोकसंदेश दिले होते.