शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

केळीच्या रोपांसाठी शेतकऱ्यांची पिळवणूक, ब्राह्मणपुरी येथील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST

याबाबत अधिक माहिती अशी की, ब्राह्मणपुरी परिसरात गेल्या एप्रिल व मे महिन्यात खरिपाची तयारी करून शेतकरी वर्गाकडून केळी, पपईची ...

याबाबत अधिक माहिती अशी की, ब्राह्मणपुरी परिसरात गेल्या एप्रिल व मे महिन्यात खरिपाची तयारी करून शेतकरी वर्गाकडून केळी, पपईची लागवड करण्यात आली आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी लागवड करण्यासाठी विविध एजन्सींमार्फत रोपांची ऑर्डर दिली होती. काही शेतकऱ्यांना मागणीनुसार रोपे उपलब्ध होऊन त्यांनी रोपांची लागवड केली आहे. परंतु ब्राह्मणपुरी येथील शेतकरी मधुकर दशरथ पाटील यांनी गेल्या ६ मे रोजी शहादा येथील पांडुरंग ॲग्रो एजन्सीमार्फत केळीच्या पाच हजार रोपांची मागणी केली होती. यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिरोप १५ रुपयाप्रमाणे ७५ हजार रुपयेदेखील जमा केले होते. पांडुरंग एजन्सीतर्फे संबंधित शेतकऱ्याला २५ मे दरम्यान केळीची रोपे उपलब्ध करण्यात येतील व आपली लागवड वेळेवर हाेईल, असे सांगण्यात आले. २५ मे रोजी संबंधित शेतकऱ्यांनी केळी रोपांविषयी विचारणा केली असता, संबंधित एजन्सीतर्फे टाळाटाळ होत होती. महिना उलटूनही रोपे उपलब्ध होत नसल्याने रोपांची लागवड करायची कधी? असा प्रश्न उपस्थित होत असून, उशिरा लागवड झाल्याने केळी पिकाला योग्य भाव मिळणार नसल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

एजन्सीमालक आऊट ऑफ कव्हरेज

शेतकरी मधुकर दशरथ पाटील यांनी संबंधित एजन्सी मालकाला केळी रोपांसाठी संपर्क केला असता, फोन उचलत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यामुळे संबंधित एजन्सी मालकाने शेतकऱ्यांना वेळेवर रोपे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वेळेवर लागवड होण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

केळी लागवडीसाठी एप्रिल व मे महिना पोषक वातावरण असते. यासाठी शेतकरी वर्ग कर्ज घेऊन केळी रोप, खत, ठिबक सिंचन आदींच्या तयारीत असतात व लागवड करतात; परंतु काही ॲग्रो एजन्सींकडून शेतकऱ्यांना वेळेवर रोपे उपलब्ध न करीत असल्याने शेतकऱ्यांना केळी रोपांची लागवड उशिराने करावी लागते, तर काही शेतकऱ्यांना इतर पीक लागवडीचा आधार घ्यावा लागतो. यासाठी संबंधित कंपन्यांनी एजन्सीमार्फत शेतकऱ्यांना रोपे वेळेवर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पांडुरंग ॲग्रो एजन्सीला केळी रोपांची ऑर्डर देण्यात आली होती. त्यासाठी एकूण ७५ हजार रोख देण्यात आले होते. एजन्सीमार्फत २५ मे दरम्यान रोपे उपलब्ध होणार होती. परंतु महिना उलटूनदेखील रोपे उपलब्ध होत नसल्याने केळी रोपांची लागवड करायची तरी कधी? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे.

- मधुकर दशरथ पाटील, शेतकरी, ब्राह्मणपुरी, ता. शहादा