सौर उर्जेच्या बॅटरीचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 12:55 IST2020-10-10T12:55:00+5:302020-10-10T12:55:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहिर : सौर उर्जेच्या बॅटरीचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दुकान व घर जळून खाक झाल्याची घटना ...

Explosion of solar energy battery | सौर उर्जेच्या बॅटरीचा स्फोट

सौर उर्जेच्या बॅटरीचा स्फोट


लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहिर : सौर उर्जेच्या बॅटरीचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दुकान व घर जळून खाक झाल्याची घटना तोडीकुंड, ता.अक्कलकुवा येथे घडली. यात तीन लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मोलगी पोलिसात नोंद कण्यात आली.
अककलकुवा तालुक्यातील तोडीकुंड येथील लालसिग मोग्या वसावे (पाटीलपाडा )यांचे वालबा रोड राहत्या घरातच त्यांचे किराणा दुकान व मोटरसायकल चे गॅरेज असुन यात आज सकाळी नऊ ते साडे नऊ च्या सुमारास सौर उर्जेच्या बॅटरीच्या स्फोट होऊन घरातील किराणा दुकान व मोटरसायकल चे गॅरेजचे व चांदीचे दागिने सह रोख रक्कम असे अंदाजे तीन ते सव्वातीन लाखाचे नुकसान झाले असुन, यावेळी घरातील सदस्य गावातील अंत्ययात्रेत गेले असल्याने कोणाला दुखापत झाली नाही.
तोडीकुंड येथील लालसिग मोग्या वसावे पाटीलपाडा यांचे वालबा रोडवर फाट्यावर विलायती कौलारू सागवान लाकडाचे राहते घर असुन या घरात त्यांचे किराणा दुकान व मोटरसायकल चे गॅरेज चालवत असतात.
शुक्रवारी सकाळी साडे नऊ च्या सुमारास सौर उजार्चे बॅटरीच्या स्फोट झाल्याने त्याच्या घराला आग लागुन घरातील संसारोपयोगी जीवनावश्यक वस्तूं, किराणा दुकानातील माल व मोटरसायकल चे गॅरेज चे साहीत्य, जनरेटर, गॅलेन्डर मशीन, कटर मशीन असे सव्वादोन लाख व रोख ४५ हजार रुपये व चांदीचे ३५ हजार रुपये चे दागिने असे सव्वातीन लाखांचे नुकसान झाले असुन, घर पुर्ण पणे जळून गेले आहे. सुदैवाने यावेळी गावात मौत झाली असल्याने तेथे गेले होते व लहान मुले बाहेर खेळत असल्याने ते वाचले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नुकसानग्रस्तांना मदत मिळावी अशी मागणी परिसरातून व्यक्त होत आहे.

 

Web Title: Explosion of solar energy battery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.