शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले जनआरोग्य योजनेवर आतापर्यंत ५२ कोटी रुपयांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST

दारिद्र्यरेषेवरील व दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींसाठी शासनाकडून महात्मा फुले जनआरोग्य योजना चालवण्यात येते. या अंतर्गत ९७१ आजारांवर दीड लाखापर्यंत मोफत उपचार ...

दारिद्र्यरेषेवरील व दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींसाठी शासनाकडून महात्मा फुले जनआरोग्य योजना चालवण्यात येते. या अंतर्गत ९७१ आजारांवर दीड लाखापर्यंत मोफत उपचार व देखभाल खर्च देण्यात येतो. गेल्या वर्षात कोरोनामुळे नागरिकांचा खर्च वाढून आर्थिक समस्याही वाढल्या आहेत. यातून महात्मा फुले जनआरोग्य योजना मात्र सहाय्यकारी ठरत असल्याचे दिसून आले आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार २०२० व २०२१ या वर्षात एकूण २२३ जणांनी योजनेचा लाभ घेतला आहे. यातील केवळ पाचजणांचे उपचारानंतरचे क्लेम शिल्लक होते. मागील वर्षात ५६ जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले होते. ३७ जणांवर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत; तर ११ जणांचे जनआरोग्य योजनेंतर्गतचे उपचारांचे शेड्युल तयार करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालय, नवापूर आणि तळोदा उपजिल्हा रुग्णालय, अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात, तर नंदुरबार येथील तीन आणि शहादा येथील दोन खासगी रुग्णालयांत या योजनेंतर्गत उपचार होत आहेत.

नागरिकांना किरकोळ आणि साध्या आजारांवर सहज उपचार मिळत असल्याने जनआरोग्य योजनेतील सहभाग वाढला असल्याची माहिती देण्यात येत आहे. २०१७ पासून नावात बदल करून लागू करण्यात आलेल्या जनआरोग्य योजनेत नंदुरबार जिल्ह्यातून एकूण २४ हजार १६३ नागरिकांचे क्लेम शासनाने नियुक्त केलेल्या इन्शुरन्स कंपनीकडे करण्यात आले होते. यासाठी इन्शुरन्स कंपनीकडे ५९ कोटी १९ लाख ३१ हजार ५३५ रुपयांची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, इन्शुरन्स कंपनीकडून पूर्ण झालेल्या २२ हजार ५१४ शस्त्रक्रियांसाठी नियुक्त केलेल्या खासगी व शासकीय दवाखान्यांना ५२ कोटी १९ लाख २६ हजार ८४२ रुपयांचा खर्च वर्ग करण्यात आला आहे.

योजनेत शस्त्रक्रियेनंतर १० दिवसांची औषधी आणि घरी जाण्यासाठी भाडे देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दुर्गम भागातील दुर्धर व दीर्घ आजारांनी पीडित असलेल्या अनेकांना या योजनेतून खर्च मिळाल्याने त्यांच्यावर उपचार शक्य झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.