साडेतीन लाखाची लाच घेताना PWD च्या कार्यकारी अभियंतास अटक 

By मनोज शेलार | Updated: March 3, 2023 08:54 IST2023-03-03T08:54:29+5:302023-03-03T08:54:59+5:30

महेश पाटील यांनी 43 लाखाची लाचेची मागणी केली होती.

Executive Engineer of PWD arrested for accepting bribe of 3.5 lakhs | साडेतीन लाखाची लाच घेताना PWD च्या कार्यकारी अभियंतास अटक 

साडेतीन लाखाची लाच घेताना PWD च्या कार्यकारी अभियंतास अटक 

नंदुरबार- शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता महेश प्रतापराव पाटील (51) मुळ रा.नाशिक यांना 3 लाख 50 हजाराची लाच घेताना नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी रात्री अटक केली. 

शहाद्यातील बांधकाम ठेकेदार यांच्या कामाचे बिल काढण्यासाठी व नवीन कामाचा कार्यारंभ आदेश देण्यासाठी कार्यकारी अभियंता महेश पाटील यांनी 43 लाखाची लाचेची मागणी केली होती. त्यातील साडेतीन लाख रुपये पाटील यांच्याच शासकीय निवासस्थानी स्विकारताना पाटील यांना पथकाने अटक केली. दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच नंदुरबारात मंडळ अधिकारीस 70 हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली होती.

Web Title: Executive Engineer of PWD arrested for accepting bribe of 3.5 lakhs