पुन्हा एकदा मुंबई रिटर्नमुळे खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 12:30 IST2020-05-30T12:30:06+5:302020-05-30T12:30:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा/बामखेडा : हिंगणी, ता.शहादा येथील मयत शिक्षकावर गुरुवारी मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या संपर्कातील हायरिस्क २८ ...

पुन्हा एकदा मुंबई रिटर्नमुळे खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा/बामखेडा : हिंगणी, ता.शहादा येथील मयत शिक्षकावर गुरुवारी मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या संपर्कातील हायरिस्क २८ जणांना रात्रीच क्वॉरंटाईन करून त्यांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, शहादा येथील गरीब नवाज कॉलनीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तामुळे परिसर सील करण्यात आला आहे. त्याच्या संपर्कातील १६ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. शहादा शहर कोरोनामुक्त झाले असतांना हा रुग्ण सापडल्याने कोरोनामुक्तीचे समाधान अवघे दहा दिवसच टिकू शकले.
गुरुवारी कोरोना पॉझिटिव्हचे दोन अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. त्यात हिंगणी येथील मुंबई रिटर्न शिक्षकाचा तसेच शहादा येथील गरीब नवाज कॉलनीतील एकाचा होता. हिंगणी येथील शिक्षकाचा २७ मे रोजीच मृत्यू झालेला होता. परंतु सिव्हीलला याबाबत शंका असल्याने त्यांचा दुसऱ्यांदा स्वॅब घेवून तो तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर २८ रोजी मृतदेह हिंगणी येथे नेण्यात आला. तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हिंगणी येथे खळबळ
शहादा तालुक्यातील हिंगनी येथील ४९ वर्षीय मुंबई रिटर्न शिक्षकाचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेतांना मृत्यू झाला. या शिक्षकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
या रुग्णाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील २८ जणांना क्वॉरंटाईन करण्यात येवून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. शिक्षक १५ मे रोजी मुंबईहून हिंगनी येथे आपल्या मूळगावी आले. ग्रामपंचायतीने त्यांना क्वॉरंटाईनही केले. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने तºहाडी व वरूळ, ता. शिरपुर येथे खाजगी डॉक्टराकड़े तपासणी केली.
डॉक्टरांनी त्यांना वडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तपासणीचा सल्ला दिला तिथे तपासणीनंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा पहिला अहवाल निगेटीव्ह आला होता. लागलीच दुसºया दिवशी त्यांचा मृत्यू झाला. हिंगनी येथे अंत्यविधी करण्यात आला. दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. मयत शिक्षक मुंबईहुन आल्यानंतर आपल्या मित्र परिवारच्याही संपर्कात आलेले आहे. जिल्ह्याबाहेर जाऊन खाजगी डॉक्टरांकडे प्राथमिक उपचार केलेला असल्यामुळे चिंता वाढली आहे.
मयत रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती आणि त्याच्या दूसरा रिपोर्ट बाकी होता तरी रुग्ण मृत झाल्या नंतरही जिल्हा रुग्णालयाने मृतदेह गावी पाठविण्यास घाई का केली? मृतदेह गावी पाठविताना ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित आरोग्य यंत्रणेला का कळविण्यात आले नाही? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणाच संशयाच्या भोवºयात सापडली आहे.
शहाद्यात उपाययोजना
येथील प्रभाग क्रमांक चार मधील गरीब नवाज कॉलनीतील ६२ वर्षाच्या इसमाचा अहवाल कोरोना विषाणू बाधीत आल्याने शहर कोरोना मुक्त असल्याचा आनंद केवळ दहा दिवसाचाच ठरला. बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य व परिसरातील एकूण १६ नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वँबचे चे नमुने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
२८ मे रोजी रात्री शहरातील गरीब नवाज कॉलनी परिसरातील एका नागरिकाचा कोरोना विषाणू बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला संबंधित रूग्ण हा यापूर्वीच्या कंटेनमेंट झोनमधील आहे कोरोना विषाणू बाधित असलेल्या या रुग्णावर शहरातील एका खासगी रुग्णालयात यापूर्वी उपचार करण्यात आले होते सदर रुग्णालय प्रशासनाने सिल केले असून येथील कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केले असून त्याचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहे. बाधित रूग्णावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
कोरोना विषाणू बाधित अहवाल आल्यानंतर काल रात्रीपासून प्रशासन सतर्क झाले असून संपूर्ण गरीब नवाज काँलनी परिसराला सिल करण्यात आले असून पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत निजंर्तुकीकरण केले जात आहे या भागाला प्रशासनातर्फे कंटेनमेंट घोषित करण्यात आले आहे.
मुंबई रिटर्न असलेल्या रुग्णांची संख्या आठ झाली आहे. नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील सहाजण, शिंदखेडा तालुक्यातील एकजण आणि हिंगणी, ता.शहादा येथील एकाचा समावेश आहे. त्यामुळे बाहेर गावाहून येणाऱ्यांवर आता लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.
हिंगणी येथील मयताच्या संपर्कातील २८ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहे. त्यांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. याशिवाय शहादा येथील रुग्णाच्या संपर्कातील १६ जणांना क्वॉरंटार्इंन करण्यात आले आहे. त्यांचेही स्वॅब घेण्यात आले आहेत.
मयत शिक्षकावर गुरुवारी मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातून सर्व प्रक्रिया करून मृतदेह पाठविण्यात आला. गावाच्या स्मशानभूमीत पाच नातेवाईक व प्रशासनाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
आम्ही ग्रामपंचायतमार्फत पूर्ण खबरदारी घेतली होती. सदर कोरोनाग्रस्त व्यक्ति मुंबई हून गावी आला तेव्हा त्याची प्रकृती चांगली होती. त्याला व त्याच्या कुटुबियाना होम क्वॉरंटाईन करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर आम्ही सतत आरोग्य विभागाच्या संपर्कात होतो. तरीही जेव्हा मृतदेह गावी आनन्यात आला तेव्हा आम्हाला कळविन्यात आले नाही, ही बाब दुर्देवी आहे.
-सुनील पाटील, सरपंच, हिंगणी