शहादा येथे एकाच मृतदेह आढळून आल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 12:08 IST2017-10-31T12:08:27+5:302017-10-31T12:08:27+5:30

शहादा येथे एकाच मृतदेह आढळून आल्याने खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा शहरातील गोमाई नदी पात्रात एकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आह़े
रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास टेक भिलाटी जवळ अज्ञात 35 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता़ यावेळी नागरिकांनी कळवल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली होती़ यात हा मृतदेह श्रावण वसंत पाटील याचा असल्याची माहिती मिळाली़ त्यास दारू पिण्याचे व्यसन असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आह़े याबाबत विनोद त्र्यंबक पाटील यांच्या खबरीवरून शहादा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आह़े