शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

कामगार नोंदणीसाठी कर्मचा-यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:45 PM

अटल विश्वकर्मा अभियान : जिल्ह्यातील उद्दीष्टे पूर्ण करण्यात येताय अडचणी

नंदुरबार : अटल विश्वकर्मा अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येत आह़े अभियांनातर्गत 10 हजार कामगार नोंदणीचे उद्दीष्ट देण्यात  आले आह़े परंतु प्रत्यक्षात 4 हजार 663 इतक्याच कामगारांची नोंद झाली आह़े उद्दीष्टांची पूर्तता करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येत आह़ेराज्यातील बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून 4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान कामगार नोंदणी अभियान सुरू केले आह़े यासाठी संबंधित विभागाकडून धुळे व नंदुबार या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी दहा हजार कामगार नोंदीचे उद्दीष्ट देण्यात आलेले होत़े परंतु प्रत्यक्षात जेमतेम कामगार नोंदणी होत असल्याचे लक्षात आल्यावर 4 ऑगस्टची मुदत वाढवून ती 14 ऑगस्ट करण्यात आलेली होती़ अभियानाचे दहा दिवस वाढवल्यावरसुध्दा नंदुरबारातील उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचा:यांची दमछाक होत असल्याचे दिसून येत आह़े नंदुरबार जिल्ह्यात 13 ऑगस्टर्पयत एकूण 4 हजार 663 कामगारांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आह़े त्यामुळे अवघ्या काही दिवसात जास्तीत जास्त 500 मजुरांची नोंद केली तरी निम्मेच टार्गेट पूर्ण करणे अधिकारी व कर्मचा:यांना शक्य होणार असल्याची यातून दिसून येत आह़े 4 जुलै ते 4 ऑगस्टदरम्यान ‘अटल विश्वकर्मा अभियान’ योजनेंतर्गत खान्देशातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यांसह सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, परभणी, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ या राज्यातील एकूण 10 जिल्ह्यांमध्ये हे विशेष नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आह़े संबंधित कामगारांमध्ये बांधकामकामगार, दगड कामगार, फरशी कामगार,  पेंटर, सुतार कामगार, यांत्रिकीकरणाशी संबंधित कामगार, नाले बांधकाम करणारे कामगार, प्लम्बिंग कामगार, अग्निशमन यंत्राची निर्मिती करणारे कामगार, सुरक्षा उपकरणांची निर्मिती करणारे कामगार, सौर ऊज्रेशी संबंधित कामगार आदी कामगारांचा यात समावेश होतो़ नोंदणी करून घेण्यासाठी कामगारांजवळ वर्षातून किमान 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हव़े शिवाय, रहिवासी दाखला, फोटो असलेले ओळखपत्र, बँकेचे पासबुक, पासपोर्ट साईज तीन फोटो आदींची गरज आह़ेअभियान राबविण्यासाठी संबंधित अधिका:यांना ठिकठिकाणी फिरावे लागत आह़े त्यामुळे या फिरत्या पथकासाठी शासनाकडून संबंधितांना मोबाईल व्हॅन देण्यात आली आह़े अक्कलकुवा, धडगाव, मोलगी आदी दुर्गम भागात कामगार नोंदणी अभियान राबवले जात आह़े