शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
2
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
3
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
4
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
5
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
6
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
7
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
8
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
9
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
10
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
11
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
12
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
13
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
14
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
15
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
16
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
17
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
18
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
19
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
20
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे भान मिळाले नंदूरबारला तिसरे स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST

सुमारे ११ हजार ६०७ शासकीय आणि खासगी वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा यांना कोरोव्हॅक्सीन ही ...

सुमारे ११ हजार ६०७ शासकीय आणि खासगी वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा यांना कोरोव्हॅक्सीन ही लस दिली जाणार असल्याने त्यांची माहिती ॲपवर भरुन देण्यात आली होती. यातील वयाने कमी आणि शारिरिक क्षमता अधिक सक्षम असलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्ह्यात प्रथम मान देत लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला होता. या लसीकरणाला जिल्ह्यात चार ठिकाणी सुरुवात करण्यात आली होती. परंतु दैनंदिन ४०० लाभार्थींना लस देण्याचे उद्दिष्ट् ठेवण्यात आले होते. परंतू अनेकांनी लसीकरणाला दांडी मारल्याने १०० लस देण्याचे उद्दिष्ट् अपूर्ण राहत असल्याचे दिसून आले होते. यातून आणखी तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आल्यानंतर दिवसभरात ७०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट् समोर आले होते. याची पूर्ती होत असली तरी अद्याप मोठा पल्ला शिल्लक आहे.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची होतेय जनजागृती

लस घेतल्यानंतर किरकोळ ताप आणि इतर लक्षणे समोर आली आहेत. यातून काही आरोग्य कर्मचारी लस घेण्यासाठी येत नसल्याने दैनंदिन कोटा पूर्ण होण्यास अडचणी येत आहेत. परिणामी आरोग्य विभागाकडून आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना लसीकरणासाठी पाचारण करण्याची तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार ४४० अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत. त्यांच्या लसीकरणाने जिल्ह्यातील लस घेणाऱ्या महिलांची टक्केवारी वाढणार आहे. आरोग्य विभागातील विविध संवर्गात काम करणाऱ्या महिलांनाही लसीकरण करण्याच्या सूचना आहेत.

कोरोना लसींचा दुसरा डोज आरोग्य विभागाला प्राप्त

पहिल्या टप्प्यातील लसीकरण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू होणार आहे. यासाठी दुसऱ्या टप्प्यातील एकूण १० हजार ५०० डोज जिल्ह्याला मिळाले आहेत. यानुसार कामकाज होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १२ हजार ५०० डोज देण्यात आले होते. एकूण ११ हजार ६०७ लाभार्थींना हे डोज द्यायचे आहेत. आज अखेरीस जिल्ह्यातून ३ हजार ३६८ जणांचे लसीकरण झाले आहे. पहिल्या टप्प्यातील १२ हजार ५०० आणि दुसऱ्या टप्प्यात १० हजार ५०० अशा एकूण २३ हजार लसींचा साठा सध्या आरोग्य विभागाकडे आहे.

लसीकरणात वाढ करण्यासाठी आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले आहे. यात प्रामुख्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यावर भर देण्यात आला आहे.

जिल्ह्यात लसीकरण करण्यासाठी तीन नवीन सेंटर्स काढले आहेत. दर दिवशी ७०० जणांचे लसीकरण होईल असे नियोजन केले आहे. लसीकरण वाढवण्यासाठी सर्वच स्तरावरुन प्रयत्न करत आहोत.

-डाॅ. एन.डी.बोडके,

जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदूरबार.