नंदुरबारात अग्निशमन बंबाखाली दाबला गेल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू

By मनोज शेलार | Published: September 29, 2023 06:53 PM2023-09-29T18:53:43+5:302023-09-29T18:54:12+5:30

चालकाविरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

employee died after being died under a fire bomb in nandurbar | नंदुरबारात अग्निशमन बंबाखाली दाबला गेल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू

नंदुरबारात अग्निशमन बंबाखाली दाबला गेल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू

googlenewsNext

मनोज शेलार, नंदुरबार : अग्निशमन केंद्रात बंब काढतांना कर्मचाऱ्याच्या अंगावरून बंब गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नंदुरबारात घडली. याप्रकरणी चालकाविरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी पहाटे ही घटना घडली.

ईश्वर झुलाल गोसावी (४५) रा.नंदुरबार असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. गणेश विसर्जन मिरवणुकांनंतर रस्त्यावर पडलेला गुलाल धुण्यासाठी नंदुरबार अग्नीशमन केंद्रातून चालक धाकू जगन्नाथ धनगर हे बंब केंद्रातून बाहेर काढत होते. त्यावेळी अचानक कर्मचारी ईश्वर गोसावी यांच्या अंगावरून बंब गेला. त्यात त्यांचे दोन्ही पाय चाकाखाली दाबले गेले. शिवाय इतरही ठिकाणी ईजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सदा श्रावण देवरे यांनी फिर्याद दिल्याने धाकू धनगर यांच्याविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलिसात अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार माधुरी कंखरे करीत आहे.

Web Title: employee died after being died under a fire bomb in nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात