शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

गाव, पाड्यांचे विद्युतीकरण पुर्ण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 11:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात विद्युतीकरणाचे बाकी असलेले गाव व पाडे तातडीने पुर्ण करावे तसेच सोलरचे कामे तातडीने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात विद्युतीकरणाचे बाकी असलेले गाव व पाडे तातडीने पुर्ण करावे तसेच सोलरचे कामे तातडीने पुर्ण करावे अशा सुचना खासदार डॉ.हिना गावीत यांनी जिल्हा विकास व समन्वय समितीच्या सभेत बोलतांना दिल्या.जिल्हा विकास व समन्वय समितीची सभा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. खासदार डॉ.हिना गावीत यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड.सिमा वळवी, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार शिरिष नाईक, जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, अशासकीय सदस्य डॉ.कांतीलाल टाटीया, डॉ.रविंद्र बैसाणे, बबीता नाईक, प्रदीप वळवी आदी उपस्थित होते.यावेळी विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. खासदार डॉ.हिना गावीत यांनी सांगितले, जिल्ह्यातील दुर्गम भागात अनेक गाव व पाडे अद्यापही विद्युतीकरणापासून वंचीत आहेत. या ठिकाणी वीज पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या कामांना वेग देण्यात यावा. ज्या ठिकाणी भौगोलिक अडचणी असतील अशा ठिकाणी सौर उर्जेचा पर्याय निवडावा. सौर उर्जेला प्राधान्य देण्यात यावे. नर्मदा काठावरील अनेक गावांमधील सौरउर्जेवरील स्ट्रीट लाईट बंद आहेत. जवळपास ६५० सौर लाईट बसविण्यासाठी प्रस्ताव आहेत. त्यापैकी एकही आलेला नाही. ते तातडीने उपलब्ध करून द्यावे अशा सुचना खासदार गावीत यांनी केल्या.बीएसएनएलची यंत्रणा जिल्ह्ययात सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावा. दुर्गम भागात अधिकाधिक ठिकाणी मोबाईल टॉवर उभारावे. पुरहाणीतील रस्त्यांची दुरूस्तीला मंजुरी देण्यात आली आहे. निधी मंजुर करण्यात आला आहे. त्यात ११ रस्त्यांचा समावेश आहे. १३ कोटी रुपये त्यासाठी मंजुर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.पाणी पुरवठा योजनेसंदर्भात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी मुद्दा उपस्थित केला. यासाठी प्रत्येक तालुकानिहाय आढावा बैठक घेण्यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सुचीत केले.ग्रामीण भागात केंद्र पुरस्कृत योजनांची माहिती देण्यासाठी ग्रामीण भागात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.भारुड यांनी दिली.यावेळी सदस्यांनी देखील विविध प्रश्न उपस्थित केले.महामार्ग व ग्रामिण रस्ते दुरूस्तीला प्राधान्य देण्याच्या सुचना बैठकीत देण्यात आल्या. अती पावसामुळे अनेक भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात देखील होत आहेत. या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी स्थानिक स्तरावर प्रस्ताव सादर करावेत. याकरीता विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून घ्यावा. महामार्ग दुरूस्तीसाठी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. नवीन रस्त्यांनाही प्राधान्य दिले जात आहे.