शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यातील 27 ग्रा.पं.चा निवडणूक कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 11:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  तालुक्यातील मुदत संपलेल्या २७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  तालुक्यातील मुदत संपलेल्या २७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली असून, २३ डिसेंबरपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे.             तालुक्‍यात १५० ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी नागझिरी, कोटबांधणी, राणीपूर, असलोद, न्यू असलोद या पाच ग्रामपंचायतींची मुदत यापूर्वीच संपली आहे. या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला होता. परंतु कोरोनामुळे तो रद्द करण्यात आल्याने आता पुन्हा या ठिकाणी नव्याने निवडणुका होणार आहेत. तसेच जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत तालुक्यातील एकूण २२ ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्याठिकाणीही निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यात एकूण २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

निवडणुकीचा कार्यक्रम२३ ते ३० डिसेंबर सार्वजनिक सुट्टी वगळून नामनिर्देशनपत्रे मागवणे व सादर करणे, ३१ डिसेंबर छाननी, ४ जानेवारी नामनिर्देशन पत्र मागे घेणे व त्याच दिवशी दुपारी निवडणूक चिन्ह तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध, १५ जानेवारी मतदान, १८ जानेवारी मतमोजणी असा निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध केला आहे.

निवडणुका हाेणाऱ्या ग्रामपंचायतीकुकावल, कोठली त.सा., कुऱ्हावद त.सा., कौठळ त.सा., दोंदवाडे, तोरखेडा, नांदरखेडा, वर्धे त.श., टेंभे त.श., शेल्टी, बामखेडा त.सा., बामखेडा त.त., फेस, पुसनद, सोनवद त.श., कानडी त.श., मनरद, मोहिदे त.श., सारंगखेडा, डामरखेडा, हिंगणी, नागझिरी, कोटबांधनी, राणीपूर, असलोद, न्यू असलोद आदी २७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

उमेदवार शोध मोहिमग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी गावागावात राजकीय हालचालींना वेग आला आहे.  निवडणूक कार्यक्रम घोषित होत          नाही तोच गावागावात तगडा उमेदवार देण्याची शोधमोहीम आखली जात  आहे. निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमधूनच बहुमत  सिद्ध करून सरपंच निवड होणार असल्याने आपल्या मर्जीतला  उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात पुढे करण्यासाठी पॅनल प्रमुख सरसावले आहेत.