शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

पं.स.सभापती, उपसभापतींची आज निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील सहाही पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींची निवड गुरुवार, १६ रोजी होत आहे. नंदुरबार व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील सहाही पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींची निवड गुरुवार, १६ रोजी होत आहे. नंदुरबार व शहादा पंचायत समितींवर भाजपची, नवापूर, अक्कलकुवा पंचायत समितींवर काँग्रेस तर धडगाव पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता बसण्याचे जवळपास निश्चित आहे. तळोदा पंचायत समितीत समसमान जागा असल्यामुळे काँग्रेस व भाजपने दावा केला आहे.नुकतीच पंचायत समितीची निवडणूक पार पडली. सहापैकी दोन पंचायत समितींवर भाजपने, दोन पंचायत समितींवर काँग्रेसने व एका पंचायत समितीवर शिवसेनेने वर्चस्व मिळविले आहे. तळोदा पंचायत समितीत भाजप व काँग्रेसला निम्मे निम्मे जागा मिळाल्या आहेत.या सर्व पंचायत समितींचा कार्यकाळ १६ जानेवारीपासून सुरु होणार असल्याने याच दिवशी सभापती व उपसभापतींची निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सहाही पंचायत समितींचे सभापतीपद हे अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे. त्यात शहादा, अक्कलकुवा व धडगावचे सभापतीपद हे महिलांसाठी राखीव आहे. तर नंदुरबार, नवापूर व तळोदाचे सभापतीपद हे पुरुषांसाठी राखीव आहे.अतिटीच्या शहादा, नंदुरबार, तळोदा येथील लढतींमध्ये काठावरचे बहुमत अनुक्रमे भाजप व काँग्रेसला मिळाले आहे. तर अक्कलकुवा व नवापूर येथे काँग्रेसने तर धडगावला शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळविले आहे.तळोदा येथे दोन्ही पक्षांना समसमान जागा मिळाल्याने प्रत्येकी अडीच वर्ष सभापतीपदाचा फार्म्यूला निश्चित करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सहाही पंचायत समितींमध्ये त्या त्या पक्षांचे सभापती कोण होतील याबाबत अद्यापही निश्चितता नसल्याचे सांगण्यात आले.सकाळी ११ वाजेपासून सभापती, उपसभापती पदाच्या निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यासाठी त्या त्या पंचायत समिती आवारात आवश्यक तो पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात येणार आहे.नवापूर पंचायत समितीकॉग्रेसने सभापती निवडीसाठी सावध पवित्रा घेतला आहे. अकरा सदस्य सहलीवर असुन उद्या वेळेवर सर्व एकाच वेळी उपस्थित होतील असे नियोजन करण्यात आले आहे. भाजप व राष्ट्रवादी कॉग्रेसने युती करुन वीस जागा लढविल्या होत्या. त्यात भाजपाला कधी नव्हे अश्या चार जागा तर राष्ट्रवादी कॉग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत. काठावर बहुमत असल्याने कॉग्रेसकडुन ही व्युहरचना आखण्यात आली आहे. भाजपामधुन कोळदा गणातुन निवडुन आलेले राजेश पद्माकर गावीत यांची गटनेते पदी निवड करण्यात आली आहे. कॉग्रेसचे सर्वच सदस्य बाहेर असल्याने गटनेते पदावर कुणाची निवड झाली हे समजु शकले नाही.तळोदा पंचायत समितीभाजपाचे प्रतोद पदी विजय राणा तर गटनेते पदी दाज्या पावरा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तळोदा पंचायत समितीत भाजपा व काँग्रेसला पाच-पाच जागा मिळाल्या आहेत. भाजपाच्या नवनिर्वाचित सदस्य विजय राणा यांची प्रतोद पदी निवड करण्यात आली असून दाज्या पावरा यांची गटनेता पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी, प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी, नगराध्यक्ष अजय परदेशी, यशवंत पाडवी, योगेश चौधरी उपस्थित होतेपंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीवर जिल्हा परिषदेतील सत्तेचे गणित अवलंबून राहणार आहे. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी देखील केली जात असल्याचे चित्र आहे. गुरुवारी काय होते यावर राजकीय गणित अवलंबून आहे.