शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

आठ ठिकाणी घरफोडीने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मंदाणे, ता.शहादा येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री आठ ठिकाणी घरफोडी करून लाखो रुपयांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मंदाणे, ता.शहादा येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री आठ ठिकाणी घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. सर्वाधिक २० लाखांचा ऐवज शिक्षक दाम्पत्याच्या घरातून चोरी झाला आहे. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले, परंतु उपयोग झाला नाही. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. चोरट्यांना लवकरच जेरबंद करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.शहादा तालुक्याच्या पूर्व भागातील मोठ्या लोकसंख्येच्या व बाजारपेठ असलेले मंदाणे गाव मध्यप्रदेश सिमेलगत असलेल्या मंदाणे गावात ही घटना घडली. मध्यवस्तीत रविवार, २ रोजी मध्यरात्री चोरट्यांनी चोरी केली. गावात शहाद्याकडून प्रवेश करतांना मुख्य रस्त्याला लागून असलेल्या शिवाजी नगरात प्राथमिक शिक्षक शशिकांत बेहरे, सचिन बेहरे, दिनेश बेहरे तसेच चांदसैली रस्त्यालगत असलेल्या चिंतामण पितांबर मोरे, हिंमतराव मोरे, गढी परिसरातील विश्वासराव मोरे, दिनकर पवार यांच्या बंद घरांचे कुुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरट्यांनी ऐवज लंपास केला.शिक्षक दाम्पत्याला सर्वाधिक फटकाया चोरीच्या घटनांमध्ये सर्वाधिक ऐवज शिक्षक दाम्पत्याच्या घरातून चोरी झाला आहे. शशिकांत बेहरे हे कुटंूबियांसह नाशिक येथे मुलीकडे गेले होते. परत येतांना त्यांना उशीर झाल्याने रात्री ते शहादा येथील त्यांच्या निवासस्थानी थांबले. त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील दागीने, रोख रक्कम व इतर ऐवज असा सर्व मिळून १९ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. घरातील कपाटातील साहित्य फेकून अस्ताव्यस्त केले आहे.विश्वासराव मोरे यांच्या घरातून रोख रक्कम व ऐवज असा एकुण ३५ ते ४० हजारांचा ऐवज चोरून नेला. इतर घरातून चोरट्यांना हाती फारसे काही लागले नाही.मंदीरातही प्रयत्नगावात असलेल्या भगवान महावीर मंदीरातील दानपेटीही फोडण्यात आली. त्यातील अंदाजे पाच हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले आहेत. मंदीरात इतर ठिकाणीही चोरट्यांनी ऐवज शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना फारसे काही मिळू शकले नाही.श्वानपथक दाखलमंदाणेसह परिसरात एकाच रात्री आठ ठिकाणी चोरी होण्याची ही पहिलीच घटना असल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. भितीचे वातावरण देखील पसरले आहे. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी घरफोडी झालेल्या घरांकडे धाव घेतल्याने बघ्यांची एकच गर्दी झाली होती.चोरट्यांची हिंमत आणि एकाच गावातून इतक्या संख्येने घरफोडी होण्याची घटना घडली असल्याने पोलिसांनी देखील गांभिर्याने घेतले आहे. पोलीस पाटील सुभाष भिल यांनी पोलिसांना ही माहिती कळविली.पोलीस उपअधीक्षक पुंडलीक सपकाळे, पोलीस निरिक्षक नजन पाटील, सहायक निरिक्षक दिनेश भदाणे, उपनिरिक्षक भगवान कोळी, विक्रांत कचरे, योगेश राऊत, हवालदार दिपक गोरे, प्रदीप राजपूत, विजय विरे, मोहन ढमढेरे, पुरुषोत्तम सोनार, अशोक कोळी, तारासिनग वळवी, ओगले यांनी भेट देवून पंचनामा केला.श्वानपथक मागविण्यात आले. श्वानाने जवळच असलेल्या मुख्य रस्त्यालगत माग दाखवत तेथेच घुसमटला. याशिवाय ठसेतज्ज्ञ देखील दाखल झाले होते.

गावात प्रथमच एवढी मोठी घटना घडली असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड भिती आणि भयाचे वातावरण होते. त्यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. सकाळी गावात पोलीस पथक आल्यावर त्यांनी पहाणी केली. त्यावेळी पोलिसांनी ग्रामस्थांशी आणि तेथे उपस्थित पत्रकारांशी अरेरावी केली, अपशब्द देखील वापरले.मंदाणे गाव मध्यप्रदेश सिमेलगत असल्यामुळे आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.