शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

पोल्ट्रीच्या शहरातच अंड्यांची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यात सर्व दूर ‘पोल्ट्रीचे शहर’ म्हणून परिचित असलेल्या नवापूर शहरात सध्या अंड्यांची टंचाई जाणवत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : राज्यात सर्व दूर ‘पोल्ट्रीचे शहर’ म्हणून परिचित असलेल्या नवापूर शहरात सध्या अंड्यांची टंचाई जाणवत आहे. बर्ड फ्लूमुळे सर्व पोल्ट्री उद्‌ध्वस्त झाल्याने येथे अंडी मिळणे दुरापास्त झाले आहे. एकीकडे कोरोना संसर्ग वाढल्याने इम्युनिटीसाठी अंड्यांची मागणी वाढली असताना शहरातील अंडी उत्पादन थांबल्याने व्यावसायिकांना गुजरातमधून अंडी मागवावी लागत आहेत.

महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या नवापूर शहरात १९७१ पासून पोल्ट्री व्यवसायाला चालना मिळाली आहे. २००१ पासून तर हा व्यवसाय अधिकच भरभराटीला आला होता. पोल्ट्री व्यावसायिकांची संख्या या काळात ७० पेक्षा अधिक गेली होती. परंतु २००६ मध्ये बर्ड फ्लू आल्याने हा व्यवसाय पुन्हा डळमळला. मात्र तेवढ्याच लवकर सावरलाही. पोल्ट्री व्यावसायिकांनी नव्या जोमाने व्यवसायाला गती दिली. त्यामुळे २००६च्या बर्ड फ्लू नंतर पोल्ट्री व्यावसायिकांची संख्या घटली असली तरी पोल्ट्रीमधील पक्ष्यांची संख्या दुपटीने झाली. गेल्या वर्षापर्यंत या ठिकाणी जवळपास ३५ पेक्षा अधिक पोल्ट्री फार्म सुरू होते. यातील पक्ष्यांची संख्या सुमारे १५ लाखांवर होती. रोज या ठिकाणी २० लाखांहून अधिक अंडी गुजरातमध्ये विक्रीसाठी जात होती. त्यामुळे या व्यवसायातून प्रचंड मोठे अर्थकारण सुरू होते. मात्र २०२०च्या अखेर या ठिकाणी बर्ड फ्लूचा पुन्हा शिरकाव झाल्याने पोल्ट्री व्यवसाय उद्‌ध्वस्त झाला. पहिल्या टप्प्यात त्याचे सौम्य रूप होते. पण जानेवारी व फेब्रुवारी २०२१ मध्ये त्याची तीव्रता वाढल्याने नवापूरसह गुजरातच्या हद्दीत असलेल्या सर्व पोल्ट्री फार्ममधील पक्षी नष्ट करावे लागले. जवळपास १५ लाख पक्षी नष्ट झाल्याने येथील पाेल्ट्री फार्म आता पक्ष्यांविना रिकामे पडले आहेत. सहाजिकच अंडी उत्पादनही पूर्णपणे थांबले आहे.

या पार्श्वभूमीवर कोरोनाची दुसरी लाट अधिकच तीव्र आल्याने इम्युनिटीसाठी अंड्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे कधी नव्हे ते नवापूर शहरात दुसऱ्या शहरातून अंडीविक्रीसाठी येऊ लागली आहे. विशेषत: येथील मोठे व्यावसायिक अहमदाबादहून अंडी मागवत असून, आठवड्यात या शहरात एक लाखाहून अधिक अंडी विक्रीसाठी मागवावी लागत आहे.