शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट कामांमुळे वाहतुकीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिंचपाडा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बहुतांश कामे अर्धवट राहिले आहे. त्यामुळे आंतरराज्य वाहतुक ठप्प होऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्कचिंचपाडा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बहुतांश कामे अर्धवट राहिले आहे. त्यामुळे आंतरराज्य वाहतुक ठप्प होऊन वाहन नियोति ठिकाणी अपेक्षित वेळेवर पोहोचत नाही. तर हिच अर्धवट कामे अपघातांनाही कारणीभूत ठरत आहे. हे अपघात टाळण्यासाठी रखडलेल्या कामांना गती देण्याची मागणी होत आहे.नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा या मार्गाची व्याप्ती वाढवत आंतरराज्य वाहतुकीत सुरक्षितता व आरण्यासाठी २०१० व २०१३ पर्यंत सर्व्हे करण्यात आले. सर्व्हेनुसार शासनामार्फत आवश्यक तो निधीही मंजूर करण्यात आला. त्यातून मार्ग चौपरीकरणाचे काम काही वर्षांपूर्वीच हाती घेण्यात आले. परंतु चौपदरीकरण कामातील अनेक पूल व ठिकठिकाणी रस्त्याचे देखील कामे रखडली आहे.या मार्गावरील मंजूर कामे ठराविक अंतरानुसार वेगवेगळ्या मक्तेदारांना काम देण्यात आले होते. त्यात नवापूर तालुक्यातील बेडकी ते धुळेपर्यंतच्या रस्ता विकास कामांसाठी एका ठेकेदाराला काम देण्यात आले होते. परंतु त्याला काही कारणास्तव हे काम पेलवता आले नाही. रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी पुन्हा हेच काम दुसºया ठेकेदाराला देण्यात आले. परंतु दुसºया ठेकेदारानेही या कामात उदासिनता दाखवल्याने कामे रखडली. त्यामुळे या मार्गावरुन होणाºया आंतरराज्य वाहतुकीवर परिणाम होत आहे. या वाहतुकीत सुरक्षितता आणत सुरळीतताही आणण्यासाठी ही कामे तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. म्हणून कामांना गती देण्याची मागणी आंतरराज्य वाहतुकदारांसह स्थानिक नागरिकांमधूनही होत आहे.पश्चिम रेल्वेच्या चिंचपाडा येथील रेल्वे गेटची उंचीमहामार्गवरुन होणाºया अवजड वाहतुकीसाठी अनुकूल तयार करण्यात आला नसल्याचे अनेक ट्रकचालकांसह अवजड वाहतुक करणाºया चालकांमार्फत सांगण्यात येत आहे. अपेक्षेनुसार उंची ठेवण्यात आली नसल्यामुळे या वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. हा धोका टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांमार्फत योग्य उपाययोजना करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.महामार्ग व रेल्वे हे दोन्ही विषय केंद्र शासनांतर्गत येत आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या कामाला गती देण्यासाठी अपेक्षेनुसार तरतुद होणे अपेक्षित होते. परंतु केवळ यासाठी कुठलीही स्वतंत्र भूमिका घेण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे.४रखडलेल्या कामांमध्ये नवापूर तालुक्यातील रायंगण, विसरवाडी, नवापूर येथील पुलांसह ठिकठिकाणी चौपदरीकरणचे काम देखील रखडले आहे. या कामांना गती देण्याची मागणी होत आहे.