शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST

नंदुरबार : पाचवी ते बारावीच्या शाळ सुरू झाल्या, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील शाळांमध्ये येण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध ...

नंदुरबार : पाचवी ते बारावीच्या शाळ सुरू झाल्या, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील शाळांमध्ये येण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शैक्षणिक नुकसानदेखील होत असून ग्रामीण भागातील बस फेऱ्यांसह मानव विकास मिशनच्या बसेसही सुरू करण्याची मागणी होत आहे.

नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहेत, तर पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले आहे. परंतु ग्रामीण भागात एसटी बसेससह मानव विकास मिशनच्या बसेस देखील सुरू नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आधीच कोरोनामुळे रोजगार बुडालेल्या सर्वसामान्य कुटुंबांना दररोज भाडे खर्च करून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे शक्य नाही. काही भागात बससेवा सुरू झाली असली तरी शाळेच्या वेळेत फेऱ्या नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळे वेळापत्र पूर्वीप्रमाणे अर्थात लॅाकडाऊनच्या आधी होते त्या प्रमाणे सुरू करावे, अशी मागणी होत आहे.

अनेक मार्गांवर एकही फेरी नाही...

n जिल्ह्यातील अनेक मार्गांवर एसटीची एकही फेरी नसल्याचे दिसून येते. ज्या मार्गावर उत्पन्न मिळू शकेल अशाच मार्गावर फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. अशा भागात विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. खासगीवाहनेदेखील शाळेच्या वेळेत राहत नसल्याने विद्यार्थी शाळेपासून वंचित राहत आहे.

शाळेच्या वेळेनुसार होते आधी एसटीचे वेळापत्रक...

n लॅाकडाऊनच्या आधी शाळांच्या वेळेप्रमाणे एसटीचे ग्रामीण भागातील वेळापत्रक होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ते सोयीचे ठरत होते. लॅाकडाऊननंतर मात्र बस बंद झाल्या. नंतर सुरू झाल्या तर वेळापत्रक बदलण्यात आले. त्यामुळे अनेक मार्गांवर दिवसातून एक किंवा दोनच फेऱ्या होतात.

n विद्यार्थिनींसाठी असलेल्या मानव विकास मिशनच्या बसेस देखील सुरू केलेल्या नाहीत. विद्यार्थ्यांना सवलत पासची सोय करण्यात आली असली तरी वेळेवर बसेस नसल्यामुळे त्या पासचाही उपयोग होत नसल्याची स्थिती आहे.