शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

११ वाजण्याच्या वेळ मर्यादेमुळे व्यावसायिकांची झाली धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:31 IST

नंदुरबार : किराणा, भाजीपाला, फळ विक्रीसह इतर दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याच्या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांसह व्यावसायिकांचीही मोठी ...

नंदुरबार : किराणा, भाजीपाला, फळ विक्रीसह इतर दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याच्या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांसह व्यावसायिकांचीही मोठी धावपळ झाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. काही ठिकाणी पोलिसांना दंडुकाही उगारावा लागल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात १ तारखेपासून संचारबंदी लागू आहे. राज्य शासनाने १५ तारखेपासून संपूर्ण संचारबंदी लागू केली. या कालावधीत आतापर्यंत सकाळी आठ ते दुपारी १ वाजेपर्यंत किराणा, भाजीपाला, फळ विक्रीसह इतर दुकाने सुरू ठेवण्याची मुभा होती. परंतु, बुधवारपासून नवीन आदेशाप्रमाणे सकाळी ११ वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याची मुभा आहे. बुधवारी सकाळी अनेक लहान व्यावसायिकांना, फेरीवाल्यांना त्याची माहिती नव्हती. त्यामुळे सकाळी ११ वाजता पोलिसांचे वाहन तसेच पालिका कर्मचारी रस्त्यावर उतरताच व्यावसायिकांची धावपळ सुरू झाली. एवढ्या लवकर दुकाने बंद करावी लागत असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. काहींनी नेहमीप्रमाणे साडेनऊ, दहा वाजता दुकाने सुरू केली. मात्र, एक ते दीड तासातच बंद करावी लागल्याने त्यांचा व्यवसाय झाला नाही. पोलिसांनी पहिला दिवस असल्याने व्यावसायिकांना दुकान बंद करण्यास काही वेळ दिला. त्यामुळे सव्वा अकरापर्यंत मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट झाला. काही ठिकाणी त्यानंतरही हातगाडीवाले, फेरीवाले दिसून आल्याने पोलिसांना दंडुका उगारावा लागल्याचेही चित्र होते.