रस्त्यांच्या दुरवस्थेने लाभार्थी स्वस्त धान्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:43 IST2019-08-16T12:42:58+5:302019-08-16T12:43:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात गत आठवडय़ात निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीनंतर विविध सेवाभावी संस्था मदत करण्यासाठी पुढे येत असताना ...

रस्त्यांच्या दुरवस्थेने लाभार्थी स्वस्त धान्यापासून वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात गत आठवडय़ात निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीनंतर विविध सेवाभावी संस्था मदत करण्यासाठी पुढे येत असताना प्रशासनाचा पुरवठा विभाग मात्र शासकीय कामात गुरफटला गेल्याचे चित्र आह़े जिल्ह्यातील 1 हजार स्वस्त धान्य दुकानात तातडीने धान्याचे वितरण गरजेचे असताना केवळ 318 दुकान मालकांनी रेशन भरणा केल्याची माहिती समोर आली आह़े रस्त्यांअभावी पुरवठा रखडल्याचे विभागाचे म्हणणे आह़े
शासनाकडून रेशन वितरण प्रणाली अधिक मजबूत व्हावी यासाठी पीओएस मशिनचा वापर केला जात आह़े यातून केवळ अंगठय़ावर लाभार्थीना धान्य मिळण्याचे नियोजन झाले आह़े मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील 500 दुकानात याप्रकारे धान्य वितरण होत आह़े दुसरीकडे गत आठवडय़ात ‘वन नेशन वन कार्ड’ ही योजना सुरु केली आह़े एकीकडे योजनांची अंमजबजावणी सुरु असताना दुसरीकडे प्रत्यक्ष धान्य वितरणाबाबत तक्रारींची मालिका सुरु आह़े जिल्ह्यात अतीवृष्टीनंतर तातडीने धान्य पुरवठा सुरु करणे गरजेचे होत़े परंतू बहुतांश ठिकाणी अजूनही लाभार्थीच्या हक्काचे धान्य पोहोचलेले नसल्याची माहिती समोर येत आह़े अतीवृष्टीमुळे तळोदा, धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्याच्या विविध भागात रस्ते तुटल्याने आणि पूल वाहून गेल्याने लाभार्थीर्पयत धान्य पोहोचू शकलेले नाही़ वाहनांद्वारे त्यांना धान्य पोहोचवणे शक्य असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आह़े रस्ते बंद असल्याने धान्य पुरवठा करण्यात येत नसल्याचे कारण देण्यात येत असले तरी विविध गावांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याची अपेक्षा सातपुडय़ातील लाभार्थीकडून व्यक्त करण्यात येत आह़े या भागात अद्यापही ऑफलाईन पद्धतीनेच धान्याचे वितरण करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आह़े
जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी दुर्गम भागातील संपर्क तुटणा:या 62 गावांना नवसंजीवनी योजनेंतर्गत स्वस्त धान्याचा पुरवठा करण्यात येतो़ यंदा जूून महिन्यात त्यांना धान्य पोहोचते झाल्याची पुरवठा विभागाकडून देण्यात आली आह़े परंतू गत 15 दिवसात संततधार कोसळणा:या पावसात हे धान्य खराब झाल्याची माहिती देण्यात येत आह़े यामुळे या गावांमध्ये पुन्हा स्वस्त धान्याचा पुरवठा करण्याची मागणी आह़े
मंगळवारी सायंकाळर्पयत जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या 20 गोदांमांमधून 544 स्वस्त धान्य दुकानांसाठी धान्य पुरवठा मंजूर करण्यात होता़ यातील केवळ 318 दुकानांच्या मालकांनी धान्याची उचल केल्याची माहिती आह़े पावसामुळे अनेक गावातील स्वस्त धान्य दुकानदार आलेलेच नसल्याची माहिती आह़े रेशनिंग मालाची वाहतूक करणारी वाहनेही पावसात अडकल्याची माहिती दिली जात आह़े या वाहनांसाठी पर्यायी मार्ग देण्याबाबत मात्र कोणतेही नियोजन करण्यात आलेले नव्हत़े
जिल्ह्यात एकूण 1 हजार 57 स्वस्त दुकाने मंजूर करण्यात आली आहेत़ यात अक्कलकुवा 199, धडगाव 173, तळोदा 108, शहादा 210, नंदुरबार 188 आणि नवापुर तालुक्यात 179 स्वस्त धान्य दुकाने आहेत़ या दुकानांमध्ये अंत्योदय योजनेंतर्गत 1 लाख 5 हजार 925 शिधापत्रिका आहेत़ दारिद्रय़रेषेखाली 1 लाख 30 हजार 971 शिधापत्रिकाधारक आहेत़ दारिद्रय़रेषेवरील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांची संख्या ही 81 हजार 773 एवढी आह़े या लाभार्थीना धान्य वितरण करण्यासाठी
4साधारण तीन लाख शिधापत्रिकाधारकांर्पयत धान्य पोहोचते करण्यासाठी 500 वाहनांची तरतूद करण्यात आल्याची माहिती आह़े एवढय़ा मोठय़ा संख्येने वाहने असतानाही दर महिन्याला 20 गोदामातून निघणारे धान्य रेशन दुकानांर्पयत वेळेवर पोहोचत नसल्याच्या तक्रारी अनेकवेळा केल्या जातात़ तूर्तास अतीवृष्टीनंतर तरी तातडीने धान्य पुरवठा करण्याची गरज असताना पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांची वाट बघितली जात असल्याचे स्पष्ट झाले आह़े अक्कलकुवा 4, धडगाव 2, तळोदा 4, शहादा 7, नंदुरबार 2 आणि नवापुर तालुक्यात 4 गोदामातून धान्य पुरवठा होतो़