नवरात्रोत्सवामुळे शहाद्यातील धार्मिक वैभवात भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:17 IST2018-10-11T12:16:57+5:302018-10-11T12:17:02+5:30

नवरात्रोत्सवामुळे शहाद्यातील धार्मिक वैभवात भर
शहादा : विश्वमाता गायत्री देवी आणि बलुचिस्थान हे मुळस्थान असलेल्या हिंगलाज देवी या दोन्ही मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठय़ा संख्येने गर्दी होत आह़े या दोन्ही देवींमुळे शहाद्यातील धार्मिक वैभवात भर पडत आह़े
शहादा शहरातील देवींच्या मंदिरात विश्वमाता गायत्री देवी आणि हिंगलाज देवी या दोन्ही मंदिराचे विशेष महत्व आह़े नवरात्रोत्सवात या दोन्ही मंदिरावर भाविकांची दर्शनासाठी रीघ लागत़े पाकिस्तान बार्डरवरील बलुचीस्थान हे मुळस्थान असलेल्या हिंगलाज देवीचे छोटेसे मंदिर सुमारे 70 वर्षापूर्वीचे शहरात आह़े हिंगलाज देवी भावसार समाजाचे आराध्य दैवत आह़े जुन्या शहरात गोमाई काठावर पुरातन भावसार मढी असून तेथेच हिंगलाज मातेचे पुरातन मंदिर आह़े 1947 साली या मंदिरात हिंगलाज मातेची स्थापना झाल्याचे जुने जाणकार सांगतात़ भावसार समाजाचे हे आराध्य दैवत असल्याने भावसार समाजाच्या भाविकांचे हे श्रध्दास्थान आह़े येथेही नवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो़ दहा दिवस भावसार मढीत भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागतात़ नवमीला देवीची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येत़े मिरवणुकी दरम्यान घरोघरी देवीची पूजा व आरती करण्यात येत़े नवरात्रोत्सवात रोज रात्री मुर्तीला स्नान घालून चंदनाचा लेप लावला जातो़ नवरात्रोत्सवा बरोबरच दरवर्षी हिंगलाज मंदिरात त्रिपूरा पौर्णिमा व कार्तिक पौर्णिमेस भंडारा केला जातो़ या शिवाय वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत़े
जुन्या धाटणीच्या घरात हे मंदिर असून गाभा:यात संगमेश्वरी दगडात कोरलेली पांढरीशुभ्र सुंदर मुर्ती आह़े साधारणत: तीन फूट उंचीची चारभूजा असलेली ही मुर्ती जयपूर येथून आणण्यात आली होती़ कमळावर आसनस्थ असलेल्या हिंगलाज मातेने एका हातात त्रिशूल, दुस:या हातात कटय़ार धारण केले आह़े मुर्तीवर सोन्या-चांदीची आभूषणे असून मुर्ती सुंदर व रेखीव आह़े
विश्वमाता म्हणून ओळखल्या जाणा:या गायत्री देवीच्या छोटय़ाशा मंदिरानेदेखील शहराच धार्मिक वैभवात भर घातली आह़े शहाद्याच्या लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टने शहराच्या मध्यवर्ती भागात माता गायत्रीचे हे मंदिर निर्माण केले आह़े गायत्री ही विश्वमाता मानली गेली आह़े तर यज्ञाला देव संस्कृती व धर्माला पिता मानले गेले आह़े दोहोंच्या समन्वयातून देव संस्कृतीचा जन्म, विकास व परिपोषण होत़े यज्ञ शब्दाचा अर्थ पवित्रता, प्रखरता व उदारता असा आह़े मानवाच्या पशु प्रवृत्तीवर अंकुश ठेवणे, अधोगामी, वाममार्गी जीवन प्रवाहाला आदर्श दिशेने प्रवृत्त करणारे नियम म्हणजे यज्ञ होय़ गायत्री मंत्राच्या 24 अक्षरात मानव जातीला शिकवण देणारी अमृतवचने भरलेली आहेत़
मंदिरात विश्वमाता गायत्री मातेची कमळावर आसनस्थ सुमारे 4 फुटाची सुंदर व बोलकी मुर्ती आह़े ज्योतिषाचार्य पंचांगकर्ते व़ेशा़सं़ धुंडीरामशास्त्री दाते सोलापूरकर यांच्या हस्ते गायत्री माता मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती़ मंदिरात दरवर्षी लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टतर्फे चैत्र व अश्विन नवरात्र, गुरुपौर्णिमा आदी धार्मिक उत्सव साजरे केले जातात़