कापसातील ओलाव्यामुळे शेतक:यांच्या घशाला कोरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:07 IST2019-10-01T12:07:32+5:302019-10-01T12:07:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात आतार्पयत कोसळलेल्या 118 टक्के पावसामुळे धरणे व बंधारे ओसंडून वाहत असले तरी या ...

कापसातील ओलाव्यामुळे शेतक:यांच्या घशाला कोरड
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात आतार्पयत कोसळलेल्या 118 टक्के पावसामुळे धरणे व बंधारे ओसंडून वाहत असले तरी या पावसामुळे शेतीपिकांना मोठा फटका बसला आह़े यात सर्वाधिक लागवड असलेल्या कापसात अद्यापही पाणी असल्याने शेतक:यांच्या घशाला चिंतेची कोरड पडली आह़े विशेष म्हणजे येत्या 7 ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात होणार असल्याने चिंतेत भर पडली आह़े
जिल्ह्यात यंदा सरासरी 2 लाख 72 हजार 852 हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी होण्याचा अंदाज होता़ त्यातुलनेत पावसाने दिलेल्या दमदार हजेरीच्या बळावर जिल्ह्यात 2 लाख 88 हजार 804 हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ यात सर्वाधिक मोठे क्षेत्र हे कापूस पिकाने व्यापले असून जिल्ह्यात यंदा तब्बल 1 लाख 28 हजार 287 हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड झाली आह़े सरासरी 127 टक्के क्षेत्रात कापूस लागवड झाल्याने वाढीव उत्पादनाची हमी देण्यात येत होती़ परंतू जुलै अखेरीपासून सुरु असलेल्या पावसाने आजअखेर्पयत उसंत घेतलेली नसल्याने कापसातील ओलावा कायम राहून लागवड खर्चही निघणार नसल्याची स्थिती उत्पन्न झाली आह़े ओलाव्यामुळे झाडावर आलेली बोंडे काळी पडून, पानांवर बुरशी आणि अळ्या पडत आहेत़ यातून 25 टक्के उत्पादन हातातून गेल्यात जमा असल्याची माहिती शेतकरी देत आहेत़ फवारणी आणि इतर कामे करुनही उत्पादन हाती येत नसल्याने शेतक:यांना आर्थिक फटका बसला आह़े दरदिवशी मजूर शेतात घेऊन जाणे परवडत नसतानाही शेतकरी खर्च करुन पीक वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत़ यात येत्या दस:यापासून कापूस खरेदीला प्रारंभ होणार असल्याने शेतक:यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आह़े
4संततधार पावसामुळे खराब झालेला कापूस आणि शेतकरी यांच्यातील संवादाचे मीम्स सध्या सोशल मिडियात फिरत आहेत़ हे मीम्स शेतक:यांच्या पिका बद्दलच्या संवेदना दर्शवत आहेत़
4जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे 74 हजार 440 हेक्टर कोरड आणि 54 हजार हेक्टर बागायती पिकांचे नुकसान झाले आह़े यात 65 टक्के क्षेत्र हे कापसाचे असल्याची माहिती आह़े अद्याप अधिकृत आकडेवारी नसली तरी 45 हजार हेक्टर कापूस 33 टक्क्यार्पयत खराब झाला आह़े
सीसीआयकडून जिल्ह्यातील शहादा आणि नंदुरबार येथे खरेदी केंद्र दिवाळीत सुरु करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े सीसीआयकडून 5 हजार 650 रुपये प्रतिक्विंटल कापसाला भाव जाहिर केल्याची माहिती आह़े यानुसार खरेदी होण्याची शक्यता असली तरी दिवाळीतही ही खरेदी होणार किंवा कसे याकडे शेतक:यांचे लक्ष लागून राहणार आह़े जिल्ह्यात दरदिवशी पावसाचा शिडकावा होत असल्याने बोंडातून बाहेर पडलेल्या कापसात ओलावा वाढत आह़े यातून सरकी खराब होण्याची स्थिती निर्माण झाल्याने खराब सरकीचा कापूस व्यापारी खरेदी करत नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत़ ओल्या कापसाला जिनिंग किंवा बाजार समित्यातील व्यापारी भाव देत नसल्याने शेतकरी पाऊस थांबावा यासाठी प्रार्थना करु लागले आहेत़ जिल्ह्यातून गेल्यावर्षी सीसीआयने 36 हजार कापूस गाठी खरेदी केल्या होत्या़ गतवर्षी दुष्काळामुळे उत्पादन न आल्याने कापूस दरांमध्ये शेवटर्पयत पडझड कायम होती़