शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांअभावी ‘एसटी’ला लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नागरी वाहतूक व्यवस्थेचा सर्वात मोठा दुवा असलेल्या परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवासीच येत नसल्याचे चित्र ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नागरी वाहतूक व्यवस्थेचा सर्वात मोठा दुवा असलेल्या परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवासीच येत नसल्याचे चित्र आहे़ यामुळे नंदुरबार आगारातून १ जूनपासून रडतखडत सुरु झालेल्या एसटीच्या बसफेऱ्या प्रवाशांअभावी रद्द करण्यात आल्या असल्याने एसटीला पुन्हा ब्रेक लागला आहे़जिल्ह्यात चार दिवसात तब्बल २४ कोरोनाबाधित समोर आल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर नंदुरबार शहर चार दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे़ या पार्श्वभूमीवर शहरातून बाहेर जाणे आणि आत येणाºया वाहनांना लगाम बसावी म्हणून सर्वत्र बॅरीकेटींग करण्यात आले आहे़ या लॉकडाऊनचा सर्वाधिक मोठा फटका एसटीला असून मंगळवार आणि बुधवार अशा दोन दिवसात बसस्थानकातून एकही बस सुटलेली नाही़ यामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे़ नंदुरबारसोबतच इतर शहादा, नवापूर आणि अक्कलकुवा आगारातही हीच स्थिती असून दर दिवशी किमान अडीच हजार फेºया करणारे चारही आगार गेल्या १५ दिवसात ५०० फेºयाही पूर्ण करु शकलेल्या नाहीत़ चारही आगारातून प्रतीदिवस १२ फेऱ्यांप्रमाणे वाहतूक सुरु करण्यात आली होती़ परंतू बºयाच वेळा प्रवासी नसल्याने फलाटावर लावलेली बसच रद्द करण्याची वेळ संबधित आगारावर आली आहे़ शुक्रवारी लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर पुन्हा फेºया सुरु होतील अशी अपेक्षा असली तरी एसटीला पूर्ववैभव प्राप्त करण्यासाठी किमान सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागेल असे मत एसटी महामंडळाचे अधिकारी कर्मचारीच वर्तवत आहेत़विशेष बाब म्हणजे प्रवाशांची काळजी घेऊन त्यांना योग्य त्या पद्धतीने प्रवास करता यावा यासाठी सॅनेटायझेशन, हँडवॉश स्टँड, थर्मल स्कॅनिंग, मोफत मास्क वाटप यासह विविध उपक्रम राबवले आहेत़ यासाठी आगारांकडून खर्च केला जात आहे़ यानंतरही प्रवाशांची संख्या वाढत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ शनिवारपासून नियमित १२ बसफेºया सुरु करण्याचे नियोजन नंदुरबार आगाराने करुन ठेवले आहे़