शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

पावसामुळे वाण्याविहीर येथे घर कोसळल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 1:17 PM

आई व मुलगा जखमी : वाण्याविहीर येथील घटना

वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथे  जोरदार पावसामुळे शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद मराठी शाळेजवळील संतोष धोंडू कदम यांचे कौलारू घर अचानक कोसळून आई व मुलगा जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्याचेही मोठे नुकसान झाले. वाण्याविहीर गावातील ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद मराठी शाळेजवळ हातमजुरी करून उदरनिर्वाह करणा:या संतोष धोंडू कदम (मराठे) यांचे कौलारू घर होते. येथे पावसाची संततधार सुरू असून शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास हे कौलारू घर अचानक कोसळले. त्यावेळी घरात संतोष धोंडू कदम, वंदना संतोष कदम, स्वाती संतोष कदम व कृष्णा संतोष कदम झोपले  होते. घर कोसळल्याने वंदना संतोष कदम (42) व मुलगा कृष्णा संतोष कदम (12) यांना डोक्याला          किरकोळ मार लागल्याने दुखापत झाली आहे. या घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्याचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून कदम यांचा संसार उघडय़ावर आला आहे. हातमजुरी करून उदरनिर्वाह          करणा:या या कुटुंबाला शासनाने त्वरित आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.