ढोल ताशांची विक्री यंदा झालीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 12:46 IST2020-08-30T12:46:46+5:302020-08-30T12:46:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : नंदुरबार जिल्ह्यातील गणेश मुर्त्यांप्रमाणे या ठिकाणचे ढोल-ताशे बनविणारे कारागीर ही प्रसिद्ध आहेत. संपूर्ण राज्यभरातून ...

Drum cards have not been sold this year | ढोल ताशांची विक्री यंदा झालीच नाही

ढोल ताशांची विक्री यंदा झालीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : नंदुरबार जिल्ह्यातील गणेश मुर्त्यांप्रमाणे या ठिकाणचे ढोल-ताशे बनविणारे कारागीर ही प्रसिद्ध आहेत. संपूर्ण राज्यभरातून या ठिकाणच्या ढोल ताश्याना मागणी असते. मात्र यावर्षी कोरोनामुळे सरकारने मिरवणुका आणि इतर कार्यक्रमांवर बंदी आणल्याने याचा परिणाम ढोल ताशाच्या विक्रीवर झाला आहे. गजबजलेली ही दुकाने आता ओस पडली आहेत. त्यामुळे लाखोंची उलाढाल ठप्प झाली आल्याचे दिसून येत आहे.
कोरोनामुये शेकडो कारागिरांचा रोजगार गेला असून, काही जणानी आता तयार केल्या वस्तू तश्याच पडून असल्याने रोडाच्या कडेला बसून विक्रीसाठी दुकाने थाटली आहेत. मात्र त्यांना ही अल्प प्रतिसाद मिळत आहे. ढोल ताशाच्या विक्रीतून होणाऱ्या उलाढाली ठप्प असल्याने पारंपरिक व्यवसाय असणाºया कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
भारतभर गेल्या पाच महिन्यापासून कोरोना महामारीमुळे संचारबंदी सुरू आहे. या दरम्यान आलेले सण-उत्सव व लग्न सोहळे, अंत्यविधी यात्रा यासह विविध कार्यक्रमांवर नियंत्रण आले होते. या महामारीमुळे लहान व्यावसायिकांचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येऊन पोहोचली आहे. येणाºया सन उत्सवांना लागणारे विविध साहित्य खरेदी करण्याकरिता व्यवसायिकांनी राष्ट्रीयकृत बँकेतून, खाजगी संस्थेतून कर्ज उपलब्ध करून कच्चामाल आणून त्याचा पक्का माल तयार केला होता. मात्र कोरोना महामारीमुळे लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शासनाच्या आदेशान्वये संचार बंदी असल्याने कुठलेही सण-उत्सव साजरा न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अगोदरच आणलेला कच्चामाल सण-उत्सव निमित्त तयार होवून पडून राहिल्यामुळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उचललेले कर्ज कसे फेडावे असा प्रश्न या व्यावसायिकांसमोर उपस्थित होत आहे.
शहादे येथील चर्मकार समाजातील ज्येष्ठ नागरिक सीताराम डोंगर चव्हाण यांच्या चामडी चप्पल, बूट, पिशवीचा पारंपारिक व्यवसाय आहे. त्याच्या जोडीला गणेश उत्सवा करिता लागणारे ढोल-ताशादेखील बनवण्याचे काम गेल्या २० वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. त्यासाठी लागणारा कच्चामाल गुजरात राज्यातून चार ते पाच महिने अगोदर आणून त्याच्यावर प्रक्रिया करून ढोल-ताशा तयार होत असतो. गेल्या वर्षभरातपर्यंत या उत्सवात लाख-दीड लाखाचे उत्पन्न मिळवून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो.
सध्या माझ्या कुटुंबातील १५ ते १७ व्यक्तींच्या पालनपोषणाची जबाबदारी माझ्यावरच आहे. परंतु यावर्षी मात्र सर्वच सण-उत्सवांवर शासनाकडून कोविडच्या पार्श्वभूमिवर निर्बंध आल्याने ढोल-ताशाचा उठाव झालेला नाही. उत्पन्न सोडा परंतु उचल केलेले कर्ज फेडण्याची क्षमता राहिली नसल्यामुळे आता शासनाने तरी चर्मकार समाजाला कर्ज माफ करावे अशी मागणी सीताराम चव्हाण यांनी केलेली आहे.

Web Title: Drum cards have not been sold this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.